Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोना संसर्ग

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोना संसर्गाची लागण झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोना संसर्ग
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना कोरोना संसर्गाची (Corona) लागण झाली आहे. शरद पवार यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. कोरोना संसर्ग झाला असला तरी काळजी करण्याची गरज नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

डॉक्टरांच्या सल्ल्यानं उपचार सुरू असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली आहे. तर, गेल्या काही दिवसांमध्ये संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करुन घ्यावी आणि काळजी घ्यावी, असं शरद पवार यांनी आवाहन केलं आहे.

गेल्या काही दिवसामंध्ये महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांना कोरोना संसर्ग झाल्याचं दिसून आलं होतं. आता शरद पवार यांना देखील कोरोना संसर्ग झाला आहे. शरद पवार यांनी ट्विटरवरुन माहिती काळजी करण्याचं कारण नसल्याचं सांगितलं आहे.

माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. पण काळजी करण्याचं कारण नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. कोरोना काळात शरद पवार यांनी राज्यात विविध ठिकाणी सरकारच्या नियमांंचं पालन करत दौरे केले होते. गेले दोन दिवस शरद पवार पुणे आणि बारामतीमध्ये होते. मुंबईत आल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली ती पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर घरीच उपचार सुरु असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, सदानंद सुळे आणि रेवती सुळे यांना गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोना संसर्ग झाला होता.

राज्य महिला आयोगाच्या २९व्या वर्धापन दिनानिमित्त २५ जानेवारीला मुंबईत शरद पवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, आता त्यांना कोरोना संसर्ग झाल्यानं ते अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे.हेही वाचा

BMC Election 2022: मुंबई महापालिका वार्ड पुर्नरचनेचा आराखडा आयोगाला सादर

लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरे चौथ्या स्थानावर

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा