Advertisement

लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरे चौथ्या स्थानावर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टॉप पाचच्या (Popular Chief Ministers) यादीत आहेत.

लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरे चौथ्या स्थानावर
SHARES

देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray) यांनी स्थान पटकावलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टॉप पाचच्या (Popular Chief Ministers) यादीत असून ते चौथ्या क्रमांकावर आहेत. इंडिया टुडेच्या मूड ऑफ द नेशननं हा अहवाल दिला आहे.

लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक पहिल्या, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तिसऱ्या क्रमांकावर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन, केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन पाचव्या स्थानावर आहेत.

इंडिया टुडे-सीव्होटर द्विवार्षिक मूड ऑफ द नेशन सर्व्हे-२०२२ मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे चौथे स्थान मिळवलं आहे. ओडिशातील एकूण २ हजार ७४३ जनतेपैकी जवळपास ७१ टक्के जनतेनं मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या कामाशी समाधानी असल्याचं सांगितलं.

तर पश्चिम बंगालमधील ४ हजार ९८२ लोकांपैकी ६९ टक्के लोकांनी ममता बॅनर्जी यांच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केलं आहे.

  • तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांना ६७.५ टक्के
  • महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ६१.८ टक्के
  • केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन ६१.१ टक्के
  • दिल्लीचे अरविंद केजरीवाल ५७.९ टक्के
  • आसामचे हिमंता बिस्वा सरमा ५६ टक्के
  • छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना ५१.४ टक्के

तर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी लोकप्रिय नेत्यांच्या यादीत अव्वल क्रमांक मिळवला आहे. जगातील लोकप्रिय नेत्यांच्या (Popular Leaders) यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव आघाडीवर आहे. जागतिक नेत्यांमध्ये पंतप्रधान मोदी (Prime Minister Modi) ७१ टक्के रेटिंगसह अव्वल स्थानावर आहेत.हेही वाचा

bmc"="" target="_blank">BMC Elections 2022: मार्च महिन्यात मुंबई महापालिका निवडणुकीची शक्यता">BMC Elections 2022: मार्च महिन्यात मुंबई महापालिका निवडणुकीची शक्यता

मराठीत पाट्या, 'श्रेय फक्त माझ्या महाराष्ट्र सैनिकांचे...'; राज ठाकरेंचा इतर पक्षांना टोला

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा