परिवर्तन सभेत शरद पवार बोलणार काय?

  Ghatkopar
  परिवर्तन सभेत शरद पवार बोलणार काय?
  मुंबई  -  

  घाटकोपर - शिवसेना-भाजपची मुंबई पालिकेतील सत्ता उलथवून लावण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सज्ज झालीय. याच पार्श्वभूवर राष्ट्रवादीनं रविवारी 20 नोव्हेंबरला संध्याकाळी 4 वाजता घाटकोपरच्या पंतनगरमधील रेल्वे पोलीस परेड मैदानात परिवर्तन सभेचं आयोजन केलंय. या सभेला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार असून ते काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. इशान्य मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई या दोन जिल्ह्यांसाठी ही पहिली परिवर्तन सभा असणार आहे. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, सरचिटणीस प्रफुल्ल पटेल आणि विधानसभेतले गटनेते जयंत पाटील आदीही उपस्थित राहतील.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.