रिद्धी खुरसुंगे यांचा शिवसेनेत प्रवेश


  • रिद्धी खुरसुंगे यांचा शिवसेनेत प्रवेश
SHARE

बोरिवली - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगरसेविका रिद्धी भास्कर खुरसुंगे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. मातोश्री येथे जाऊन त्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत दाखल झाल्या. येत्या महापालिका निवडणुकीत तिकीट मिळेल, या आश्वासनानंतर खुरसंगे यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. या वेळी शिवसेना आमदार प्रकाश सुर्वेही उपस्थित होते. रिद्धी यांचे पती भास्कर खुरसुंगे यांनी विधानसभा निवडणूक झाली, तेव्हाच शिवसेनेत प्रवेश केला होता.

संबंधित विषय
ताज्या बातम्या