Advertisement

राष्ट्रवादीच्या प्रतीक्षा घुगे भाजपाच्या वाटेवर?


राष्ट्रवादीच्या प्रतीक्षा घुगे भाजपाच्या वाटेवर?
SHARES

घाटकोपर - राष्ट्रवादीच्या प्रभाग क्रमांक 126 च्या नगरसेविका प्रतीक्षा घुगे यांच्या नगरसेवक निधीतून तयार करण्यात आलेल्या दीपस्तंभांचं (हायमास्ट टॉवर) उद् घाटन चक्क गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या हस्ते झाल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. प्रतीक्षा घुगे राष्ट्रवादीला जय महाराष्ट्र करतात की काय अशी चर्चाही सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान प्रकाश मेहता हे चांगले मित्र आहेत. मैत्रीच्या नात्यातून त्यांनी दीपस्तंभाचं उद्घाटन केल्याचं नगरसेविका घुगे यांनी सांगितलं. तर दुसरीकडे या सर्व प्रकारामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये खळबळ माजलीय. जो कार्यकर्ता मनोभावे पक्षासाठी झटतो त्यांना तिकीट देऊन निवडणूक लढवण्याची संधी मिळायला हवी, अशी प्रतिक्रिया भाजपाच्या कार्यकर्त्यांनी दिलीय.

संबंधित विषय
Advertisement