मध्यावधीच्या भितीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लागला कामाला!

  Mumbai
  मध्यावधीच्या भितीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लागला कामाला!
  मुंबई  -  

  राज्यात मध्यावधी निवडणुका होतील, अशी गेल्या काही महिन्यांपासून चर्चा आहे. 'हिंमत असेल तर मध्यावधी निवडणुका घ्या' असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. मात्र राज्यात कधीही मध्यावधी निवडणुका लागू शकतील, या भितीने का होईना राष्ट्रवादी पक्ष कामाला लागला आहे असंच म्हणावं लागेल. कधीही निवडणुका लागल्या तरी राष्ट्रवादी तयार आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. विशेष म्हणजे पक्षबांधणीसाठी अजित पवार आणि सुनिल तटकरे मैदानात उतरले आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र असा दौरा हे दोन्ही नेते करणार आहेत.

  या दौऱ्यात ते संबधित जिल्ह्यातील युवक, विद्यार्थी, महिला, युवती, अल्पसंख्याक, सामाजिक न्याय विभाग, ओबीसी सेल आणि इतर फ्रंटल व सेलच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर जिल्हा प्रभारी, पक्षनिरीक्षक, जिल्ह्यातील आजी-माजी आमदार, खासदार, प्रमुख नेते, जिल्हा संघटनेतील फ्रंटल आणि सेलसहित सर्व पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, ब्लॉक अध्यक्षांनाही मार्गदर्शन करणार असल्याची माहिती तटकरे यांनी दिली.


  असा असेल  दौरा - 

  शनिवारी 1 जुलै पासून रत्नागिरी जिल्ह्यातून दौऱ्याची सुरुवात होणार आहे. तर  मंगळवारी 18 जुलै रोजी कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र करत 18 जुलैला ठाण्यामध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. 


  ऑगस्टमध्ये घेणार चिंतन शिबीर -

  गेल्या काही निवडणुकांमध्ये झालेले पराभव पाहता, पुन्हा मध्यावधी निवडणुका लागल्या, तर तशीच परिस्थिती उद्भवू नये, म्हणून राष्ट्रवादीचे नेते कामाला लागले आहेत. हा संपूर्ण दौरा केल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ झटकून टाकण्यासाठी ऑगस्टमध्ये चिंतन शिबीरही होणार असल्याची माहिती तटकरे यांनी दिली.  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.