Advertisement

उद्धव ठाकरेंची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करा - नितेश राणे


उद्धव ठाकरेंची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करा - नितेश राणे
SHARES

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये व्हावी, अशी मागणी आता होऊ लागली आहे. ही मागणी शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याने केलेली नसून, काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे. नारायण राणे आणि शिवसेना यांच्यामधील वाद काही नवे नाहीत. मात्र आता त्यांच्या मुलानेच उद्धव ठाकरे यांची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी, अशी मागणी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावणे स्वाभाविक आहे. विशेष म्हणजे तसं पत्रच नितेश राणे यांनी 'गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' संस्थेला पाठवून ते ट्विटदेखील केले आहे.

मी नितेश राणे आमदार महाराष्ट्र विधानसभा, आपणास कळवू इच्छितो की, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाची नोंद 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड' रेकॉर्डमध्ये करा. शिवसेनेने महाराष्ट्र सरकारमधून बाहेर पडण्याची धमकी सर्वाधिक वेळा दिल्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यामुळे हा बहुमान त्यांना मिळावा, असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला आहे. आमदार नितेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुखांना काढलेल्या उपरोधिक चिमट्यामुळे आता पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध राणे हा वाद रंगण्याची चिन्हे आहेत.

संबंधित विषय
Advertisement