Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,08,992
Recovered:
56,39,271
Deaths:
1,11,104
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,773
700
Maharashtra
1,55,588
10,442

आमचं काम बोलतं, प्रसिद्धीची गरज नाही, पीआर नेमण्याचा निर्णय अजित पवारांकडून मागे

सद्यस्थितीत उपलब्ध जनसंपर्क व्यवस्थेद्वारेच यापुढेही नागरिकांशी, प्रसिद्धी माध्यमांशी संवाद ठेवण्यात येईल, असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

आमचं काम बोलतं, प्रसिद्धीची गरज नाही, पीआर नेमण्याचा निर्णय अजित पवारांकडून मागे
SHARES

उपमुख्यमंत्री कार्यालयासाठी स्वतंत्र समाज माध्यमयंत्रणा नियुक्त करण्यासाठीचा शासन निर्णय बुधवारी जारी झाला होता. त्यावर आमचं काम बोलतं, त्यासाठी प्रसिद्धीची गरज नाही. माझ्या कार्यालयाला स्वतंत्र सोशल मीडिया यंत्रणेची गरज नाही. त्यामुळे यासंदर्भातील शासन निर्णय तात्काळ रद्द करावा, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. 

उपमुख्यमंत्री कार्यालयाचा सोशल मीडिया सांभाळण्यासाठी बाह्ययंत्रणा नियुक्त करण्याची बिलकूल गरज नाही. उपमुख्यमंत्री कार्यालयाला समाजमाध्यमांवर स्वतंत्रपणे कार्यरत राहण्याची गरज वाटत नाही. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या माध्यमातून शासकीय जनसंपर्काची जबाबदारी पार पाडणं शक्य असताना उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समाज माध्यमांची जबाबदारी बाह्ययंत्रणेवर सोपवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सद्यस्थितीत उपलब्ध जनसंपर्क व्यवस्थेद्वारेच यापुढेही नागरिकांशी, प्रसिद्धी माध्यमांशी संवाद ठेवण्यात येईल, असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा- पोलीस उपनिरीक्षकांना मूलभूत प्रशिक्षणासाठी पाठवणार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयासाठी स्वतंत्र समाज माध्यमयंत्रणा नियुक्त करण्यासाठीचा शासन निर्णय बुधवारी जारी झाला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार हे अनावश्यक प्रसिद्धीपासून दूर राहत असल्यामुळे या शासन निर्णयाबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत होतं. आता खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच त्यांच्या कार्यालयासाठी स्वतंत्र सोशल मीडिया सांभाळणाऱ्या यंत्रणेची गरज नसल्याचं स्पष्ट केलं असल्याने यासंदर्भातील शासन निर्णय रद्द करण्यात येणार आहे.

दरम्यान यावर भाजपने टीकेची झोड उठवली होती. राज्य सरकारकडे आॅक्सिजन प्लांट उभारायला पैसे नाहीत, नर्स, डॉक्टरांना भत्ता देण्यासाठी पैसे नाही, एसटी कामगारांचे पगार देण्यासाठी ठाकरे सरकारकडे पैसे नाहीत. मात्र पीआरसाठी ६ कोटी रुपये खर्च करण्यासाठी सरकारकडे पैसे आहेत, अशा शब्दांत भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी या निर्णयावर टीका केली होती.

परंतु आता हा निर्णय मागे घेण्यात आला आहे.

(ncp leader ajit pawar cancels decision to appoint private PR agency for deputy cm office)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा