Advertisement

छगन भुजबळांची तब्बेत बिघडली, जसलोक हाॅस्पिटलमध्ये दाखल


छगन भुजबळांची तब्बेत बिघडली, जसलोक हाॅस्पिटलमध्ये दाखल
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना जसलोक हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यामुळे त्यांना तातडीने जसलोक हाॅस्पिटलमध्ये नेण्यात आलं.

विधानसभा निवडणुकीत छगन भुजबळ येवला मतदारसंघातून निवडून आले आहेत. गुरूवारी त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना जसलोक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं हाॅस्पिटलकडून सांगण्यात आलं. 

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या पोटात अचानक दुखू लागल्यानं त्यांना तातडीनं बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.  त्यांच्या काही प्राथमिक चाचण्या करण्यात आल्या. मुंडे यांना किडनी स्टोनचा त्रास असल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे. 


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा