Advertisement

छातीत दुखू लागल्याने छगन भुजबळ रुग्‍णालयात

छगन भुजबळ यांना छातीत दुखू लागल्याने मुंबईतील जसलोक रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पीएमएलए न्यायालयात हजर होण्यासाठी जात असताना त्यांची प्रकृती अचानक बिघडली.

छातीत दुखू लागल्याने छगन भुजबळ रुग्‍णालयात
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या छातीत दुखू लागल्यानं त्यांना मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सोमवारी सकाळी पीएमएलए न्यायालयात हजर होण्यासाठी जात असताना त्यांची प्रकृती अचानक बिघडली. यामुळे त्यांना जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान त्यांना श्वसनाचाही त्रास होत आहे. पुढील उपचारांसाठी त्यांना लीलावती रुग्णालयात हलवण्यात येण्याची शक्यता आहे.


जसलोक रुग्णालयात उपचार

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी छगन भुजबळ सकाळी पीएमएलए न्यायालयात हजर होण्यासाठी जात होते. त्यावेळी अचानक त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्‍णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर मुंबईतील जसलोक रुग्‍णालयात उपचार सुरू आहेत. भुजबळ यांच्यावर डॉक्टर मेहता उपचार करत आहेत.


यापूर्वीही झाला त्रास 

महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत असताना छगन भुजबळ यांना स्वादुपिंडाचा त्रास जाणवू लागला होता. जामिनावर सुटका झाल्यानंतर त्यांना मुंबईच्या केइएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. १ आठवड्याहून जास्त दिवस रुग्णालयात राहिल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता.

छगन भुजबळ यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना जसलोक रुग्णालयात दाखल केलं आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. 

- जनसंपर्क अधिकारी, जसलोक रुग्णालय


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा