बाहुबलीने कट्टाप्पाला का मारलं? हे जाणून घेण्याची उत्सुकता जशी तुम्हा-आम्हाला होती. तशीच उत्सुकता महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांना देखील होती. हेच जाणून घेण्यासाठी जयंत पाटील यांनी गाठलं थेटं माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंचं घर! विश्वास बसत नाहीये ना? खुद्द जयंत पाटील यांनीच ही माहिती विधानसभेत दिलीये.
संघर्ष यात्रेवेळी विरोधक भाजापाचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी गेले होते. त्यावेळी सत्ताधाऱ्यांकडून विरोधक खडसेंच्या घरी का गेले? असा प्रश्न उपस्थित केला गेला. याचे उत्तर देताना जयंत पाटील यांनी 'कटप्पाने बाहुबली को क्यों मारा?' हे जाणून घेण्यासाठी खडसेंच्या घरी गेलो होतो असं सांगितलं. जयंत पाटलांच्या या उत्तरामुळे सभागृहामध्ये एकच हशा पिकला.
एकनाथ खडसे यांनी विरोधकांचा पाहुणचार चांगला केल्याचं सांगत चंद्रपुरमध्ये अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आमचा पाहुणचार केला नाही अशी कोपरखळीही त्यांनी यावेळी मारली. जयंत पाटील यांनी विधानसभेत तब्बल तीन तास भाषण केले.