राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष शिवसेनेत

 Pali Hill
राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष शिवसेनेत

चेंबूर - गेल्या काही दिवसांपासून चेंबूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठी गळती लागल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादी महिला तालुका अध्यक्षांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर मंगळवारी माजी तालुका अध्यक्ष लहू कांबळे यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केलाय. वर्षभरापूर्वीच लहु कांबळे हे अंतर्गत वादामुळे राष्ट्रवादीतून बाहेर पडले होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते चेंबूरचे शिवसेना आमदार प्रकाश फातर्पेकर यांच्या संपर्कात होते. त्यांच्या प्रयत्नांनी मंगळवारी मातोश्रीवर जावून लहु काबंळे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

Loading Comments