Advertisement

काळ्या यादीतील कंपन्या पर्यटन मंत्र्यांच्याच, नवाब मलिकांचा आरोप


काळ्या यादीतील कंपन्या पर्यटन मंत्र्यांच्याच, नवाब मलिकांचा आरोप
SHARES

धर्मा पाटील यांच्या मृत्यूनंतर नवाब मलिक यांनी पर्यटन मंत्री रावल यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप केला होता. त्याचा खुलासा रावल यांनी दिल्यानंतर लागलीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा रावल यांच्यावर निशाणा साधला आहे.


काय म्हणाले नवाब मलिक?

नोटाबंदीच्या काळात मोदी सरकारने जाहीर केलेल्या दोन लाख काळ्या यादीतील दोन कंपन्या या पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्याच आहेत. त्यापैकी तोरणमाळ हिल रिसॉर्ट प्रा. कंपनी एमटीडीसीच्या जागेवर आजही बेकायदा सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 'या प्रकरणाचे पुरावे मुख्यमंत्र्यांना देत आहोत. त्यामुळे पर्यटनमंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घेऊन त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.


तरीही कंपनी सुरूच

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानंतर देशातील काही कंपन्या बंद करण्यात आल्या. या बंद करण्यात आलेल्या कंपन्यांच्या यादीत जयकुमार रावल यांची तोरणमाळ हिल रिसॉर्ट कंपनीही आहे. मात्र, कंपनी बंद केली असली, तरी कंपनीचे व्यवहार अद्याप सुरू असून या कंपनीने रिसॉर्टचं ऑनलाईन बुकिंगही घेतलं आहे. डीलक्स रुमचे ७ हजार रुपये भाडे भरून १० फेब्रुवारीचं बुकिंग केल्याची पावतीच नवाब मलिक यांनी मिळवली आहे.


काय आहे हा घोळ?

तोरणमाळ हिल रिसॉर्ट ही कंपनी पर्यटनमंत्री जयकुमार रावल आणि त्यांच्या कुटुंबाच्या मालकीची आहे. एमटीडीसीकडून तोरणमाळ हिल रिसॉर्टने तोरणमाळ हिल भाड्याने घेतली. या कंपनीने एमटीडीसीचे ४१ लाख रुपये भाडे थकवले असून २००६ साली ताबा सोडण्याचे आदेश देऊनही ताबा न सोडता बेकायदेशीरपणे रिसॉर्टचा ताबा आपल्याकडे ठेवल्याचा आरोपही मलिक यांनी केला आहे. त्यानंतर एमटीडीसीने २०११ मध्ये सक्षम अधिकाऱ्यामार्फत 'भाडे भरा, नाहीतर जागा खाली करा', अशी नोटीस पाठवली. परंतु, हे सांगण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर गावगुंडाच्या मदतीने हल्ला करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.


अब्रुनुकसानीचा दावा म्हणजे हवेतील बोल

२२ जानेवारीला शेतकरी धर्मा पाटील यांनी विष प्राशन केल्यानंतर २८ जानेवारीला त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर नवाब मलिक यांनी पर्यटनमंत्री जयकुमार रावल हे कवडीमोल दराने शेतकऱ्यांच्या जमिनी घेवून करोडो रुपये कमवत असल्याचा आरोप केला होता. या आरोपाचं खंडण करत पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी नवाब मलिक माझी बदनामी करत असल्याचं सांगत त्यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं म्हटलं होतं. त्याप्रमाणे त्यांनी धर्मा पाटील यांचे अंत्यसंस्कार झाल्यावर धुळे पोलिस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली होती. पण अद्याप मला कोणताही समन्स आलेला नाही, असेही नवाब मलिक यांनी सांगितलं.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा