Advertisement

राजकीय सूडबुद्धीतून महाविकास आघाडीतील नेत्यांवर कारवाई- नवाब मलिक

ईडीमार्फत जी कारवाई करण्यात येत आहे, ती सर्व राजकीय सूडबुद्धीने व राजकीय हेतूने घडत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

राजकीय सूडबुद्धीतून महाविकास आघाडीतील नेत्यांवर कारवाई- नवाब मलिक
SHARES

महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांच्या विरोधात ईडीमार्फत जी कारवाई करण्यात येत आहे, ती सर्व राजकीय सूडबुद्धीने व राजकीय हेतूने घडत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा संपताच शिवसेना नेते अनिल परब यांना ईडीची नोटीस पाठवण्यात आली आहे. सोबतच भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या आरोपानंतर शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या काही संस्थांवर छापेमारी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे अनिल देशमुख यांच्या मालमत्तावर छापेमारी सुरू असतानाच सीबीआयकडून त्यांना क्लीनचीट देण्यात आल्यासंदर्भातील संशयास्पद कागदपत्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. 

यासंदर्भात भाष्य करताना नवाब मलिक म्हणाले, ईडीमार्फत महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना नोटीस देणं, काही ठिकाणी छापेमारी होणं याचे त्यांना अधिकार असतील तर त्यांनी कारवाई करावी. परंतु ज्या पद्धतीने भाजपचे लोक मागणी करत आहेत आणि कारवाई होत आहे, याचा अर्थ ठरवून राजकीय कारवाई सुरू असल्याचं मत नवाब मलिक यांनी मांडलं.

सर्वोच्च न्यायालयाने आतापर्यंत किती केसेस दाखल केल्या व प्रलंबित आहेत, याबाबत ईडीला प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगितलं होतं, याकडे लक्ष वेधतानाच भाजप केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करत आहे. त्यामुळेच ज्यांच्यात हिंमत नाही ते पक्ष सोडून भाजपमध्ये जात आहेत. भाजप बेजबाबदारपणे कृत्य करत आहे, अशी टीका नवाब मलिक यांनी केली. तसंच, आमच्यात हिंमत होती म्हणून आम्ही लढलो. कायदेशीर लढा जो आहे, तो लढावा लागेल. पण आम्ही तुमच्यासारखे पक्ष सोडून आलो नाही. तुमच्यासारखे केंद्रीय मंत्री झालो नाहीत, अशा शब्दांत नारायण राणेंनाही लक्ष्य केलं.

त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्या प्रकरणातील सीबीआयच्या प्राथमिक चौकशी अहवालाच्या बातम्या समोर आल्या आहेत. हा अहवाल सत्य की असत्य यावर आम्ही भाष्य करत नाही. त्याचा खुलासा सीबीआयने करावा, अशी मागणी देखील नवाब मलिक यांनी केली.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा