Advertisement

ईडी अटकेनंतर नवाब मलिक राजीनामा देणार?

नवाब मिलक मंत्रीपदाचा राजिनामा देण्याचीही शक्यता आहे.

ईडी अटकेनंतर नवाब मलिक राजीनामा देणार?
SHARES

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना ८ तासांच्या चौकशीनंतर अटक करण्यात आली आहे. त्यानंतर राजकिय घडामोडिंना वेग आला आहे. नवाब मिलक मंत्रीपदाचा राजिनामा देण्याचीही शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ते राजीनामा सुपुर्द करतील, अशी शक्यता वर्तवली जातेय.

नवाब मलिक यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री वळसे पाटील यांच्यात फोनवरून चर्चा झाल्याची माहिती मिळतेय.

दरम्यान, मंत्रालयात राष्ट्रवादीची बैठक सुरू असून यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, राजेश टोपे उपस्थित आहे. नवाब मलिक यांच्या अटक प्रकरणी चर्चा सुरु आहे.

तर मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात देखील संध्याकाळी बैठक होण्याची शक्यता आहे.

ईडीकडून अटक झाल्यानंतर आता विरोधकांकडून नवाब मलिकांच्या मंत्रिपदाचा राजीनामा मागण्याची शक्यता लक्षात घेता नवाब मलिक राजीनामा देण्याची शक्यता आहे.

ईडीनं ही सकाळीच नवाब मलिक यांच्या घरी धडक दिली होती. नवाब मलिक हे सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ईडीच्या कार्यालयात अधिकाऱ्यांसह दाखल झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. अनिल देशमुख यांच्यानंतर मंत्रीपदावर असताना अटक झालेले मलिक हे दुसरे मंत्री आहेत.



हेही वाचा

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना अटक

'मुस्लीम कार्यकर्ता असला तर…' नवाब मलिकांच्या ईडी चौकशीवर शरद पवारांची प्रतिक्रिया

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा