अजित पवारांच्या शपथविधीवर 'ही' आहे शरद पवारांची प्रतिक्रिया

भाजपा सोबत जाऊन अजित पवारांनी राजकीय क्षेत्रात भूकप केला. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शरद पवारांनी ही दिली पहिली प्रतिक्रिया...

SHARE

राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी घटना आज घडली. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवनात हा शपथविधी पार पडला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं अभिनंदन केलं आहे.

अजित पवार यांनी भाजपसोबत हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांचा भाजपसोबत जाण्याचा निर्णय हा वैयक्तिक असून या निर्णयाला राष्ट्रवादीचा पाठींबा नाही, असं ट्वीट शरद पवार यांनी म्हटलं आहे.



हेही वाचा

महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप, देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

म्हणून दिला भाजपला पाठिंबा, काय म्हणाले अजित पवार?


संबंधित विषय
ताज्या बातम्या