Advertisement

मुख्यमंत्री कॉपीकॅट आहेत - सुप्रिया सुळे


मुख्यमंत्री कॉपीकॅट आहेत - सुप्रिया सुळे
SHARES

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कॉपीकॅट मुख्यमंत्री असल्याची टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उत्तर-पश्चिम जिल्हा आयोजित तालुकानिहाय संवाद पदाधिकारी-कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन सोमवारी गोरेगावच्या सरदार वल्लभभाई पटेल भवनमध्ये करण्यात आले होते. त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी ही टीका केली.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, "पेट्रोल, डिझेलचे भाव वाढतात, हे दुर्दैवी आहे. दरवाढ केली आहे, त्याविरोधातही राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला. तसेच देवेंद्र फडणवीस हे कॉपी कॅट मुख्यमंत्री आहेत. जे पंतप्रधान मोदी करतात तेच फडणवीस करतात. उत्तर प्रदेशात कर्जमाफी होते तर महाराष्ट्रात का नाही? असा प्रश्न उपस्थित करत महाराष्ट्राची फसवणूक या कॉपीकॅट मुख्यमंत्र्यांनी केली", असं वक्तव्यही सुप्रिया यांनी केलं. "महाराष्ट्र आणि केंद्राचं धोरण शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. फडणवीस विरोधी पक्षनेते असताना म्हणायचे शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर सरकारवर 302 कलम लावा. आता 302 कलम कुणावर लावायचे याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे." शेतकऱ्यांवर अन्याय करायची भूमिका सरकार करत आहे. या सरकारचे शेती आणि शेतकऱ्यांकडे लक्ष नसल्याची सडकून टीकाही त्यांनी यावेळी केली.

या संवाद पदाधिकारी-कार्यकर्ता मेळाव्यात माजी मंत्री जयंत पाटील, माजी खासदार संजयभाऊ पाटील, राष्ट्रवादी पक्षाचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, महाराष्ट्र महिला अध्यक्षा चित्रा वाघ यांनी पदाधिकारी-कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा