एनसीपी नेत्यांमधील दिलजमाई

मुंबई - चेंबूरमधली 29 नोव्हेंबरची ही दृश्य... लक्षात असतीलच सर्वांच्या... नवाब मलिक यांच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार, पक्षाचे माजी मुुंबई अध्यक्ष संजय दिना पाटलांनी बंदुका रोखल्या, पक्षाचे मुख्य प्रवक्ता नवाब मलिक यांच्या समर्थकांनी तलवारी बाहेर नाचवल्या. त्यानंतर पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. पण आता या वादावर पडदा टाकण्यात आलाय. अगदी एकमेकांचे अस्तित्व संपवून टाकण्याची भाषा करणारे पुन्हा एकत्र आलेत. नवाब मलिक आणि संजय दिना पाटील यांच्यात पक्षानं दिलजमाई करून दिलीय. त्यामुळे आधी गोळ्या आणि आता गळ्यात गळा अशी खिल्ली उडवली जातेय.याप्रकरणानंतर दोषींवर कारवाई केली जाईल अशी अपेक्षा सर्वसामान्यांना होती.

पण मोठे नेते असल्यामुळे डॅमेज फॅक्टरचा विचार करुन अशा नेत्यांवर कारवाई केली नाही असा आरोप शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कांयदे यांनी केला.राजकारणात कायमस्वरुपी मैत्री आणि शत्रुत्व नसतं, हे राष्ट्रवादीतल्या राडा आणि सामोपचार नाट्यानंतर पुन्हा एकदा सिद्ध झालंय.

Loading Comments