Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
53,44,063
Recovered:
47,67,053
Deaths:
80,512
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
36,674
1,447
Maharashtra
4,94,032
34,848

शिवसेना कुणातरी वाचवण्याचा प्रयत्न करतंय का? राष्ट्रवादीकडून खुलासा

शिवसेना आणि गृहमंत्र्यांविषयी प्रश्न विचारला असता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

शिवसेना कुणातरी वाचवण्याचा प्रयत्न करतंय का? राष्ट्रवादीकडून खुलासा
SHARES

मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्ष भाजपकडून होऊ लागली आहे. या सगळ्या गदारोळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीनंतर शिवसेना आणि गृहमंत्र्यांविषयी प्रश्न विचारला असता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

याबाबत जयंत पाटील (jayant patil) म्हणाले, स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेली स्फोटकं आणि मनसुख हिरेन यांचा मृत्यू या दोन्ही प्रकरणांचा वेगवेगळा तपास सुरू आहे. स्फोटकांप्रकरणी एनआयए तपास करत आहे. हिरेन मृत्यू प्रकरणात एटीएस तपास करत आहे. यात जो कुणी दोषी आढळेल त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. यावर सत्तेतील तिन्ही पक्षांचं एकमत आहे. शिवसेना कुणालातरी वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, या म्हणण्यात काहीही तथ्य नाही, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.

हेही वाचा- गृहमंत्र्यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच नाही, राष्ट्रवादीने केलं स्पष्ट

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या दोन्ही प्रकरणांत त्या त्या वेळी योग्य भूमिका मांडलेली आहे. त्यांचं यात काहीही चुकलेलं नाही. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही. शिवाय या प्रकरणात कुठल्या पोलीस अधिकाऱ्याचा सहभाग असेल तर त्यांच्यावर कोणती कारवाई करायची याचा निर्णय तपास यंत्रणा घेतील. त्यावर काही बोलणं योग्य ठरणार नाही, असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं.

पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) दर ३ ते ४ महिन्यांनी मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेतात. त्याअनुषंगानेच आजची बैठक झाली. या बैठकीत इतर कुठल्याही विषयावर चर्चा झाली नाही, असंही जयंत पाटील यांनी सांगितलं.

दरम्यान, या प्रकरणावर भाष्य करताना, वाझे लादेन आहे का म्हणणारे मुख्यमंत्री कुठे आहेत??? आतंगवाद्यांच्या वस्तू घेऊन जर पोलीस अधिकारी लोकांना ठार मारायला लागले आणि मुख्यमंत्री त्यांची बाजू घ्यायला लागले तर अशा मुख्यमंत्र्याला त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही, त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप नेते निलेश राणे यांनी केली आहे. 

(ncp maharashtra president jayant patil reacts on anil deshmukh resignation)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा