ताईंची बाईकस्वारी

  मुंबई  -  

  मुंबई - सध्या प्रचाराची धामधूम पहायला मिळत आहे. राजकीय पक्ष, कार्यकर्ते आणि नेतेमंडळी प्रचार करत असताना अनेक वेगवेगळे किस्सेही घडताना आपण अनेकदा पहातो. असाच एक किस्सा घडलाय राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत. आणि त्यांच्या या किश्श्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

  मालाड येथील अप्पापाडामध्ये वॉर्ड 42 च्या उमेदवार धनश्री भरडकर यांच्या प्रचाराला सुप्रिया सुळे आल्या होत्या. तिथली प्रचारसभा संपवून ठाण्यात प्रचारसभेला जाताना सुप्रिया सुळे ट्रॅफिकमध्ये अडकल्या. मात्र ट्रॅफिक सुटण्याची वाट न पहाता त्या थेट एका कार्यकर्त्याच्या बाईकवरुनच ठाण्याला निघाल्या. त्यांच्या या बाईकस्वारीची चर्चा जरी सुरु झाली असली, तरी असं करताना त्यांनी ट्रॅफिकचे नियम मात्र सोयीस्करपणे धाब्यावर बसवले आहेत. विना हेल्मेट बाईक चालवणे हा खरंतर ट्रॅफिकच्या नियमांनुसार गुन्हा. पण सुप्रिया ताईंच्या बाईक ड्रायव्हरने हेल्मेटच घातले नव्हते. जानेवारी महिन्यातच अजित रावराणे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनावेळी सुप्रिया सुळे आल्या असताना त्या अशाच प्रकारे ट्रॅफिकमध्ये अडकल्या होत्या. तेव्हा मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी सु्प्रिया सुळेंना बाईकने प्रवास करण्याचा सल्ला दिला होता.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.