Advertisement

विधान परिषद उमेदवारीसाठी राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसेंची निवड

एकनाथ खडसे यांनी 2016 मध्ये भाजपचा राजीनामा दिला होता.

विधान परिषद उमेदवारीसाठी राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसेंची निवड
SHARES

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कडून एकनाथ खडसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी तर्फे याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. एकनाथ खडसे आज अर्ज भरणार आहेत. एकनाथ खडसे यांच्यासोबतच राम राजे निंबाळकर यांना देखील संधी देण्यात आली आहे. 

यासंदर्भात एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी म्हटलं की, "भाजपमध्ये इतके वर्ष मी काम केलं. पण मला नेहमी डावललं गेलं. म्हणून मी भाजप सोडला आणि राष्ट्रवादीत आलो. शरद पवार यांनी माझ्यावर विश्वास टाकत ही जबाबदारी माझ्याव र सोपवली. मी त्यांना निराश होऊ देणार नाही."  

  • आज 09 जूनपर्यंत विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.
  • 10 जूनला निवडणूक अर्जांची छाननी होईल.
  • 13 जूनपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असेल.
  • 20 जून रोजी सायंकाळी पाच नंतर मतमोजणी होईल
  • 20 जून रोजीच विधान परिषदेचं चित्र स्पष्ट होईल.

विधानसभा सदस्यांमधून परिषदेवर 10 सदस्य निवडून द्यायचे आहेत. त्यात भाजप 4, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे प्रत्येकी 2 असे एकूण 10 आमदार निवडले जाऊ शकतात. भाजपच्या चार उमेदवारांनी अर्ज भरला असून पाचव्या उमेदवार उमा खापरे यादेखील आज अर्ज भरतील.

भाजपच्या पाच उमेदवारांपैकी उमा खापरे वगळता इतर चौघांनी काल अर्ज भरले. आज उमा खापरे उमेदवारी अर्ज दाखल करतील. तर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे उमेदवार आज अर्ज दाखल करतील. शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांनी बुधवारी अर्ज दाखल केला आहे.

विधान परिषदेच्या एकूण 10 जागा रिक्त होत आहेत. यापैकी 9 आमदारांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. तर एका आमदाराचा मृ्त्यू झाला आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, उद्योगमंत्री सुभाष देसाई, विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे येत्या 20 जून रोजी 10 जागांसाठी निवडणूक होत आहे.



हेही वाचा

विधान परिषदेसाठी काँग्रेसची यादी जाहीर, भाई जगताप-चंद्रकांत हंडोरेंना उमेदवारी

भाजपकडून विधान परिषद उमेदवारांची नावं निश्चित, पंकजा मुंडेंना संधी नाहीच

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा