नथुराम गोडसेंच्या स्मारकाला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध


SHARE

कल्याणमध्ये हिंदू महासभेतर्फे नथुराम गोडसे यांचे स्मारक उभारले जात आहे. यासाठी कल्याणजवळ 2 गुंठे जमीनही हिंदू महासभेने घेतली आहे. यासाठी राजस्थानमधून नथुराम गोडसेंची मूर्ती आणण्यात येणार आहे. दोन वर्षांपूर्वी यासंदर्भात एक कार्यक्रम घेण्यात आला होता.

या स्मारकाचा राष्ट्रवादी पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधान सभेमध्ये रविवारी विरोध केला. 'नथुरामाची जयंती कल्याणमध्ये साजरी करण्यात आली होती, त्यावेळी अटकाव केला असता तर अशी परिस्थिती आली नसती'. असं सांगत आव्हाड यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. 'राज्य सरकार अशा कृत्याकडे जाणुनबुजून दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे आता देशाच्या राष्ट्रपित्याची हत्या केली त्यांचे स्मारक उभारले जात आहे', असं सांगत आव्हाड यांनी नथुराम गोडसे वाद पुन्हा उकरून काढला आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या