Advertisement

'मध्यावधी निवडणुका आल्या तर राष्ट्रवादी सज्ज'


'मध्यावधी निवडणुका आल्या तर राष्ट्रवादी सज्ज'
SHARES

मुंबई - राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा मध्यावधी निवडणुका होण्याचे संकेत दिले आहेत. शरद पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये 23 तारखेनंतर तशी परिस्थिती उद्भवलीच तर मध्यावधी निवडणुकांना सामोरं जाण्याची राष्ट्रवादीची तयारी आहे, असं लिहिले आहे.

तसंच दुसऱ्या ट्विटमध्ये अडीच वर्षांत निवडणुका आल्यास महाराष्ट्राचं फार काही नुकसान होणार नाही. राज्यातील अनेक जणांना कात्रजचा घाट दाखविणारे शरद पवार यांनी भाजपा सरकार स्थापन झाल्यापासून मध्यावधी निवडणुका होतील असं भाष्य केलं होतं. त्यानंतरही ते आपल्या विधानावर ठाम होते. शिवसेनेने भाजपाला समर्थन देण्याच्या अगोदर राष्ट्रवादी पक्षाने सरकार स्थापन करण्यासाठी समर्थन दिलं होतं.

भाजपा-शिवसेनेमध्ये वाढत चाललेली दरी आणि एकमेकांवर पातळी सोडून होत असलेले आरोप यामुळे शिवसेना लवकरच पाठिंबा काढणार असं चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे शरद पवारांनी मध्यावधी निवडणुका होतील असे संकेत आपल्या ट्विटरवरुन दिले आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा