ज्योतिरादित्य शिंदे यांच्या बंडामुळे मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकार गडगडण्याची चिन्हे निर्माण झाली असतानाच शेजारील महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याची भाजपची योजना असल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरु झाली आहे. त्यातच मध्यप्रदेशप्रमाणेच महाराष्ट्रातही महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याचे भाकीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. भाजपाच्या इतरही काही नेत्यांनी महाविकास आघाडी सरकार पडण्याचे सूचक वक्तव्य केले आहे. भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनाही ट्विटवरुन यासंदर्भात ट्विट करत अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना इशारा दिला. मात्र यावरुन राष्ट्रवादीच्या नेत्याने चोख उत्तर भातखळकर यांना दिले आहे.
हेही वाचाः- चव्हाणांचे ते मत ऐकले असते तर, बाबरी पडलीच नसती - शरद पवारकांदिवली पश्चिम मतदारसंघाचे आमदार असणार्या भातखळकर यांनी मध्य प्रदेशमधील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काल एक ट्विट केले. यामध्ये त्यांनी शेजारील राज्यातील राजकीय भूकंपाचे धक्के महाराष्ट्रात जाणवत असल्याचे म्हटले आहे. 'मध्यप्रदेशातील भूकंपाचे हादरे महाराष्ट्रात जाणावतायत का? काका जरा जपून', असं ट्विट भातखळकर यांनी केले आहे. आपल्या ट्विटमध्ये काका असा उल्लेख करुन महाविकास आघाडीची मोट बांधणार्या शरद पवार यांना भातखळकर यांनी टोला लगावला आहे. भातखळकर यांच्या वक्तव्याला राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस राज राजापूरकर यांनी फेसबुकवरुन उत्तर दिले आहे. आपल्या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी भातखळकरांना, तुम्ही जेव्हा हाफ चड्डी घालायला शिकलात तेव्हा पासून साहेब फुल पॅन्ट मध्ये वावरत आहेत, हे विसरु नका! असा टोला लगावला आहे. भातखळकर तुम्ही एक चांगले मास लीडर म्हणून ओळखले जाता. एक चांगले आमदार म्हणून देखील तुमची ओळख आहे. एकंदरीतच कमिटेड पर्सन म्हणून तुमच्या कांदिवली मतदारसंघात लोक तुम्हाला निवडून आणतात, ही खरच एक सकारात्मक प्रसिद्धी आहे.
हेही वाचाः- मुंबईतील 'या' ठिकाणची हवा अतिवाईटराजकारणातला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट म्हणून तुमच्याकडे पाहिले जाते. समाजात आदरणीय पवार साहेब हे राजकारणाचे पितामह म्हणून ओळखले जातात आणि त्यात त्यांच्या ८0 वर्षाच्या वयात पन्नास वर्ष फक्त राजकारणातल्या सहभागाची आहेत. त्यामुळे पवारसाहेबांवर उपहासात्मक टीका करून निगेटिव्ह पब्लिसिटी करून घेणे तुम्हाला शोभत नाही. तुमच्यासारख्याला आणि विशेष म्हणजे त्यांच्या राजकीय कारकीर्दीचा आढावा घेता तुम्ही जेव्हा हाफ चड्डी मध्ये होतात तेव्हापासून ते फुल पॅन्ट मध्ये वावरत आहेत, हे आपण विसरता कामा नये. त्यामुळे उगाचच सकाळच्या साखरझोपेत पाहिलेली स्वप्न साकारता येतील असं काय विचार करू नका, अशा शब्दांमध्ये राजापूरकर यांनी भातखळकरांना सुनावले आहे.