कोल्ड प्ले विरोधात रंगणार हॉट प्ले बँड

 Vidhan Bhavan
कोल्ड प्ले विरोधात रंगणार हॉट प्ले बँड
कोल्ड प्ले विरोधात रंगणार हॉट प्ले बँड
See all
Vidhan Bhavan, Mumbai  -  

नरिमन पॉईंट - गरिबी हटावच्या नावाखाली भाजपा खासदार पूनम महाजन यांच्या माध्यमातून ब्रिटनच्या कोल्ड प्ले बँडचे आयोजन करण्यात आले आहे. या विषयी बोलताना नवाब मलिक म्हणाले सरकारने ‘कोल्ड प्ले बँडला’ विविध करात सुट दिली आहे. या कार्यक्रमात दारू पिण्याची समंती दिलेली आहे. तसेच या कार्यक्रमाच्या तिकिटाचे दर हे महाग असून याचा लाभ गरिब जनतेला मिळणार नाही. त्यामुळे या 'कोल्ड प्ले बँड' कार्यक्रमाच्या विरोधात मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मुंबईत ‘हॉट प्ले बँड’ विनामूल्य वाजविण्यात येणार असून या कार्यक्रमात पुर्णपणे दारूला बंदी असणार आहे आणि गरीब लोकांना याचा आनंद घेता यावा यासाठी बीकेसीच्या सहा रस्त्यावर ‘हॉट प्ले बँड’ वाजविण्यात येणार असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे 1 करोड रूपये पकडले आहेत. त्यांची तात्काळ हकालपट्टी केली पाहीजे मोदीजी काळ्यापैशाबाबत बोलतात आधी तुमच्याच लोकांवर छापे टाका तिथेच काळधन सापडतय. भाजपचे आमदार सांगतात या निर्णयाची माहिती अदानी अंबानींना होती. पण सामान्यांना याचा त्रास होतोय. शेतकरी, मजूर हे भरडले जातायेत. जिल्हा बॅंकांमध्ये 90% शेतकर्यांचे अकाऊंट आहेत. जिल्हा बॅंकावर बंदी घालून लोकांच्या अडचणी वाढ झालीये. जिल्हा बॅंकावरची बंदी शेतकर्यांसाठी उठवा तरीही जर त्यांच्यावर विश्वास नसेल तर मंत्रालयाचे कामकाज बंद करून तुमचे बाबू नजर ठेवण्यासाठी बसवा. नोटबंदीचा निर्णय घाईघाईने घेण्यात आला. काळ्यापैशांच कोणीही समर्थन करत नाही. नोटाबंदीच्या निर्णयामुळे लोकांना खूप अडचणी येतायेत.

Loading Comments