नोटाबंदीविरोधात राष्ट्रवादीचा मोर्चा

 Pali Hill
नोटाबंदीविरोधात राष्ट्रवादीचा मोर्चा

मुंबई - नोटाबंदीविरोधात वांद्र्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस विराट मोर्चा काढणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी ही माहिती दिली. तसंच मुंबईत जिल्हानिहाय निषेध आंदोलनाचेही आयोजन करण्यात आल्याची माहिती सचिन अहिर यांनी दिली. अवघ्या काही दिवसांवर पालिका निवडणुका येऊन ठेपल्या असताना नोटाबंदीच्या मुद्द्यावरून शक्तिप्रदर्शन करण्याचा हा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

Loading Comments