Advertisement

‘जय भवानी, जय शिवाजी’! राष्ट्रवादी देणार भाजपला ‘जशास तसं’ उत्तर

अयोध्येतील राम मंदिराबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करत भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) ने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना 'जय श्रीराम' लिहिलेली १० लाख पत्रं पाठवण्याचं ठरवलं आहे.

‘जय भवानी, जय शिवाजी’! राष्ट्रवादी देणार भाजपला ‘जशास तसं’ उत्तर
SHARES

अयोध्येतील राम मंदिराबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करत भारतीय जनता युवा मोर्चा  (भाजयुमो) ने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना 'जय श्रीराम' लिहिलेली १० लाख पत्रं पाठवण्याचं ठरवलं आहे. 'भाजयुमो'च्या या रणनितीला उधळून लावण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने देखील आपडला डाव रचला आहे. (ncp will send protest letters to vice president venkaiah naidu for taking objection on jai bhavani jai shivaji slogan)

येत्या ५ आॅगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिरासाठी कोनशीला बसवण्यात येणार आहे. पंतप्रधान झाल्यापासून मोदी पहिल्यांदाच या भूमिपूजन कार्यक्रमासाठी अयोध्येला जाणार आहेत. भूमिपूजन कार्यक्रमात श्रीराम जन्म भूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास ४० किलो वजनाच्या चांदीची शीला समर्पित करतील. त्यावर कोरोनाच्या संकटकाळात आयोजित करण्यात आलेल्या या भूमिपूजन कार्यक्रमावर शरद पवार यांनी टीका केली होती.

हेही वाचा - तर तिथेच राजीनामा दिला असता- उदयनराजे भोसले

काय म्हणाले पवार?

जेव्हा अयोध्येत राम मंदिर बांधून पूर्ण होईल, त्याच दिवशी कोरोना जाईल, असं मोदी सरकारला वाटत आहे. म्हणूनच सध्याच्या परिस्थितीत देखील राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमाचा घाट घातला जातोय. सर्वत्र त्याचीच चर्चा सुरू आहे. परंतु आमच्यासाठी तर कोरोना संकटाशी मुकाबला करणंच महत्त्वाचं आहे, अशा शब्दांत शरद पवार यांनी राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमावर भाष्य केलं होतं. 

शरद पवार नेहमीच हिंदूत्वाच्या विरोधात बोलतात असं म्हणत भाजप नेत्यांनी त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला होता. त्यापाठोपाठ भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पवारांना 'जय श्रीराम' लिहिलेली १० लाख पत्र पाठवण्याचं ठरवलं आहे. भाजपच्या या डावावर कुरघोडी करत राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना 'जय भवानी, जय शिवाजी' असं लिहिलेली २० लाख पत्र पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. 

नायडूंना का?

भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी बुधवारी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर 'जय भवानी जय शिवाजी' अशी घोषणा केली होती. या घोषणेवर व्यंकय्या नायडू यांनी आक्षेप घेत महाराष्ट्रद्वेष दाखवला आहे. भाजप नेत्यांच्या मनात शिवरायांबद्दल नेमक्या काय भावना आहे हेच यातून दिसतं. त्त्याचा निषेध म्हणून आम्ही नायडूंना २० लाख पोस्टकार्ड पाठवणार आहोत, अशी माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष मेहबूब शेख यांनी दिली. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा