राष्ट्रवादीच्या गयारामांची पुन्हा घरवापसी

 Kumbharwada
राष्ट्रवादीच्या गयारामांची पुन्हा घरवापसी
Kumbharwada, Mumbai  -  

मुंबई - एमआयएममध्ये तिकीटासाठी प्रवेश केलेल्या प्रोफेसर सहिद खान, मुख्तार शेख या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. प्रभाग क्रमांक 220 मध्ये सहिद खान हे राष्ट्रवादीचे मुंबई सचिव म्हणून काम पाहत होते. मात्र एमआयएमने त्यांना उमेदवारीचे गाजर दाखवल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीला सोडून एमआयएममध्ये प्रवेश केला होता. मात्र तिकडूनही पदरी निराशा पडल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्या कार्यक्रमात पुन्हा घरवापसी केली.

Loading Comments