Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेसने 'सामना'ची केली होळी


राष्ट्रवादी काँग्रेसने 'सामना'ची केली होळी
SHARES

शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील शाब्दिक वाद आता चव्हाट्यावर आला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर केलेली टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या चांगलीच जिव्हारी लागली. त्यामुळे आक्रमक झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने सामना कार्यालयजवळील चौकात आंदोलन करत सामनाची होळी केली.

शिवसेनेने राम मंदिर बांधू असं जाहीर केल्यावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खिल्ली उडवली होती. त्यानंतर 'सामना'च्या अग्रलेखात अजित पवार यांच्यावर टीका करण्यात आली. त्यामुळे आक्रमक झालेल्या राष्ट्रवादीने सामनाच्या प्रति जाळल्या.


अजित पवारांचं प्रत्युत्तर

बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक पाच वर्ष झालं तरी रखडलं आहे, माझ्या या बोलण्याचं त्यांना चांगल्याच मिरच्या झोंबल्या, असल्याचं म्हणत अजित पवार यांनी देखील शिवसेनेला प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर पुण्यातील सामना कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसने सामना पेपरच्या प्रती जाळल्या.


काय म्हटलंय सामनात?

'अजित पवारांची खोपडी रिकामी असून ते गटारातील किडा आहे. जो गटारातील घाण पाण्यावर तो श्वास घेतो. अशा व्यक्तीला आम्ही कधीच किंमत देत नाही. काकांच्या पुण्याईमुळे ते तरले आहेत. अजित पवार यांना राज्यातील राजकारणात काडीमात्र किंमत नाही', अशी टीका शिवसेनेच्या सामनातून करण्यात आली आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा