राष्ट्रवादीचं अपघात बचाव अभियान

 BDD Chawl
राष्ट्रवादीचं अपघात बचाव अभियान
राष्ट्रवादीचं अपघात बचाव अभियान
राष्ट्रवादीचं अपघात बचाव अभियान
See all
BDD Chawl, Mumbai  -  

वरळी - सिद्धार्थनगर प्रवेशद्वारासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्या मार्गदर्शनाखाली अपघात बचाव अभियानं स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्या प्रयत्नानं एनिबेझेंट रोड झेब्रा क्रॉसिंग आणि जंपिंग लाईन सौरउर्जा सिग्नल बसविण्यात आले होते. हे सिग्नल कालांतरानं बंद पडले आहेत. या ठिकाणी सध्या रस्ता दुरुस्तीचे काम ही सुरु आहे. मात्र रस्त्याला सिग्नल यंत्रणा सुरळीत नसल्यानं अनेकदा या कामांमुळे येथील नागरिकांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागत आहे. अनेकदा अपघात होऊन नागरिक जखमी झाल्यामुळे महिला, शालेय विद्यार्थी, वरिष्ठ नागरिक यांना जीव मुठीत घेऊन येथून रस्ता ओलांडावा लागतोय. त्यामुळे निद्रीस्त कुंभकर्णी प्रशासनास जागे करण्यासाठी स्थानिक सेवादल कार्यकर्ते तानाजी बनसोडे, सुनील गायकवाड़, आकाश बनसोडे, सुनील कोलते यांनी अपघात बचाव अभियानंतर्गत स्वाक्षरी मोहीम राबविली असून विभागातील बहुसंख्य नारिकांनी पत्रकावर सही करीत प्रशासना विरुद्ध रोष प्रकट केला.

Loading Comments