'अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेवर बंदी घाला'

 CST
'अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेवर बंदी घाला'

सीएसटी - दिल्ली विद्यापिठातील विद्यार्थिनी गुरमेहर कौरच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्यांचा राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी निषेध व्यक्त केला. त्यानंतर मुंबईतील आझाद मैदानात राष्ट्रवादी पक्षाच्या युवती संघटनेने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदने दिल्ली विद्यापिठात केलेल्या आंदोलनाचा निषेध केला आहे. तसेच गुरमेहर कौरला ट्वीटवर अश्लीलपणे ट्रोल केल्याचाही निषेध व्यक्त करण्यात आला. तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या विद्यार्थी संघटनेवर बंदी घालावी अशी मागणी राष्ट्रवादी पक्षाच्या युवती संघटनेच्या मुंबई अध्यक्षा अदिती नलावडे यांनी केली आहे.

Loading Comments