Advertisement

सत्ताधाऱ्यांच्या भूखंडांना पालिकेचे अभय ?


सत्ताधाऱ्यांच्या भूखंडांना पालिकेचे अभय ?
SHARES

मुंबई - मनोरंजन मैदाने आणि खेळाची मैदाने ही दत्तक तत्त्वावर देण्याच्या धोरणाला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली आहे. त्यामुळे महापालिकेने हे भूखंड ताब्यात घेण्यासाठी नोटीस बजावल्या आहेत. मात्र २१६ भूखंडांपैकी ९० भूखंड हे शिवसेना आणि भाजप नेत्यांच्या संस्थांच्या ताब्यात आहेत. त्यांना महापालिकेकडून अद्याप नोटीस बजावण्यात आल्या नाहीत. त्यांना अभय देण्यासाठी पून्हा ११ महिन्याच्या कालावधीत दत्तक तत्वावर पालिका धोरण आखत आहे. त्या धोरणास काँग्रेसचा तीव्र विरोध असल्याचे काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरूपम यांनी स्पष्ट केले. सर्व मोकळे भूखंड ताब्यात घेऊन पालिकेने त्यांचा विकास करावा, अशी मागणी निरूपम यांनी केली आहे.

मंगळवारी संजय निरूपम यांनी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेतली. यासंदर्भात आयुक्तांना विचारणा केल्यानंतर त्यांना नोटीस देण्यात येईल असे आश्वासन दिले. पण नोटीस कधी देण्यात येईल याबाबत कोणतेच स्पष्टीकरण दिले नसल्याचे निरूपम यांनी सांगितले.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा