Advertisement

उद्धव ठाकरेंचाही ‘तो’ व्हिडिओ व्हायरल, योगींविरोधातील वक्तव्यावरून लक्ष्य

२०१८ सालचा उद्धव ठाकरे यांचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये उद्धव ठाकरे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य करताना दिसत आहेत.

उद्धव ठाकरेंचाही ‘तो’ व्हिडिओ व्हायरल, योगींविरोधातील वक्तव्यावरून लक्ष्य
SHARES

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटत असताना २०१८ सालचा उद्धव ठाकरे यांचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये उद्धव ठाकरे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य करताना दिसत आहेत. उद्धव ठाकरे यांचं हे वक्तव्य नारायण राणेंच्या वक्तव्यापेक्षा वेगळं कसं आहे ?, असे प्रश्न भाजप नेते उपस्थित करत आहेत. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेण्याच्या एक वर्ष आधी २०१८ मध्ये हे वक्तव्य केलं होतं. उद्धव म्हणाले होते, “ते मुख्यमंत्री कसे होऊ शकतात? जर तो योगी असेल तर त्यांनी सर्व काही सोडून गुहेत बसावं, पण ते मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसून स्वतःला योगी म्हणवत आहेत. त्यांना उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राचं नातं समजून घ्यावं लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी उत्तर प्रदेशातून गागाभट्ट आले होते आणि हा योगी हवेत भरलेल्या फुग्यासारखा आला. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना त्यांनी चप्पल घातली होती. मला वाटलं की त्यांना त्याच चप्पलाने मारलं पाहिजे. महाराजांच्या पुतळ्यासमोर उभं राहणारे तुम्ही कोण आहात?”

हेही वाचा- केंद्रीय मंत्री नारायण राणेंना जामीन मंजूर, शिवसैनिक आक्रमक

सोशल मीडियावर अनेकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष शिवसेनेला या 'ढोंगीपणा'साठी लक्ष्य केलं आहे. त्यांनी असंही म्हटलं आहे की योगी आदित्यनाथ यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर या वक्तव्याबाबत गुन्हा दाखल करावा.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भाजपच्या "जन आशीर्वाद यात्रे" दरम्यान केलेल्या वक्तव्याबद्दल शिवसेनेच्या तक्रारीनंतर गुन्हा नोंदवण्यात आला होता. अटकेनंतर नारायण राणे यांना महाड न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आलं होतं. पोलिसांनी राणे यांची ७ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. परंतु, न्यायालयानं दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून राणेंना जामीन मंजूर केला.


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा