Advertisement

मंत्री नारायण राणेंना महापालिकेची नव्याने नोटीस

केंद्रीय मंत्री नारायण राणे पुन्हा एखदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

मंत्री नारायण राणेंना महापालिकेची नव्याने नोटीस
SHARES

केंद्रीय मंत्री नारायण राणे पुन्हा एखदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. नारायण राणे यांना महापालिकेकडून नोटीस बजावण्यात आली आहे. जुहू येथील त्यांच्या अधिश बंगल्यात नियमबाह्यपणे बांधकामाबद्दल मुंबई महापालिकेनेही कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्याबाबत ८ दिवसांमध्ये आपले म्हणणे सादर करण्याची सूचना केली आहे.

महापालिकेच्या पथकाने २१ फेब्रुवारीला राणे यांच्या बंगल्याची कसून पाहणी केली होती. त्यामध्ये मूळ प्लॅनमध्ये बदल करून बंगल्याचे बांधकाम करून एफएसआयचे उल्लंघन केल्याचं आढळून आलं आहे. तसंच अत्यावश्यक वेळी सुरक्षिततेच्या दृष्टीने मोकळे सोडण्यात आलेल्या जागेवर (रिफ्यूज एरिया) मध्ये बांधकाम करण्यात आले असून, त्याबाबत एमआरटीपी ५३ अंतर्गत नोटीस बजावली असल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले.

शनिवारी सुमारे ९ तास पोलिसांच्या चौकशीला सामोरे गेल्यानंतर अन्य एका अडचणीला सामोरे जावे लागले आहे. दिशा सालियन हिच्या बदनामीबद्दल मालवणी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी शनिवारी नारायण राणे व नितेश राणे यांची ९ तास चौकशी करण्यात आली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा