Advertisement

निरंजन डावखरेंचा भाजपात प्रवेश, राष्ट्रवादीला धक्का

निरंजन डावखरे यांनी आमदारकी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत गुरूवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. निवडणुकीआधी डावखरे यांच्या भाजपात प्रवेशाने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.

निरंजन डावखरेंचा भाजपात प्रवेश, राष्ट्रवादीला धक्का
SHARES

कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अॅड. निरंजन डावखरे यांनी आमदारकी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत गुरूवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. निवडणुकीआधी डावखरे यांच्या भाजपात प्रवेशाने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.

यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेदेखील उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निरंजन डावखरे यांना कोकण पदवीधर संघाची उमेदवारी जाहीर केली आहे.


कधी आले होते निवडून?

निरंजन डावखरे कोकण पदवीधर मतदारसंघातून २०१२ मध्ये निवडून आले होते. त्यांचा आमदारकीचा कार्यकाळ संपत आला होता. बुधवारी त्यांनी विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्याकडे आमदारपदाचा राजीनामा सुपूर्द केला. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा पाठवला.


६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी

निरंजन डावखरे यांना आमदारकी देण्यासोबतच त्यांच्याकडे विद्यार्थी व युवक प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवून राज्याचं नेतृत्व करण्याची संधी पक्षाने दिली. तरीही केवळ संधीसाधूपणामुळे त्यांनी दुसऱ्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच त्यांची ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात येत असल्याची माहिती राष्ट्रवादीचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी दिली. निरंजन डावखरे यांना या संधीसाधूपणाचा फटका केव्हातरी, बसेल असा इशाराही गर्जे यांनी दिला.


हेही वाचा - 

राष्ट्रवादीचे आमदार निरंजन डावखरे भाजपात

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा