'सर्जिकल स्ट्राईक हा भाजपचा राजकीय स्टंट'

  मुंबई  -  

  मुंबई - भारताने सर्जिकल स्ट्राईक केलाच नसल्याचा दावा पाकिस्तान करत असताना आता आपल्याच राजकीय पक्षांनी पुरावे मागण्यास सुरुवात केली आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी देखील राजकीय लाभासाठी सर्जिकल स्ट्राईकची अफवा पसरविण्यात येत असल्याचं वक्तव्य आहे. सर्जिकल स्ट्राईकची जाहिरातबाजी करून भाजप सरकार राजकीय स्टंट करत आहे, असा दावा केला आहे.

  पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये भारताने सर्जिकल स्ट्राइक करत कारवाई केली, यादरम्यान ३० ते ३५ दहशतवादी ठार झाल्याचे भाजपकडून सांगण्यात आले. मात्र, मोदी सरकारने खोटा हल्ला घडवून आणला, असा थेट आरोप निरुपम यांनी मोदी सरकारवर केला. सर्जिकल स्ट्राईक काँग्रेस सरकारच्या काळातही झाले होते. मात्र, त्याचे कधीच राजकारण केले गेले नाही. या सर्जिकल स्ट्राईकमधून भाजप सरकार राजकीय फायदा घेण्याच्या दृष्टीने सर्जिकल स्ट्राईकची पोस्टरबाजी करताना दिसते, अशी टीका निरुपम यांनी केली.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.