Advertisement

बायको शिवसेनेसारखी पाहिजे; नितेश राणेंचा शिवसेनेला टोला

शिवसेना आणि राणे परिवार यांच्यात नेहमीच शाब्दिक सामना रंगलेला पाहायला मिळतो. २०१८ या वर्षात तर प्रकर्षाने हे दिसून आलं आहे. राणे कुटुंबांकडून अनेकदा शिवसेनेला टार्गेट करण्यात आलं असून वर्षाच्या शेवटच्या दिवशीही नितेश राणे यांनी शिवसेनेला चांगलाच टोमणा मारला आहे.

बायको शिवसेनेसारखी पाहिजे; नितेश राणेंचा शिवसेनेला टोला
SHARES

नववर्षाच्या स्वागतासाठी आता काहीच तास उरले असून रात्री वाजता मुंबईभर फटाके फुटतील. पण हे फटाके फुटण्याआधीच राजकीय फटाके फुटण्यास मात्र आताच सुरूवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी एका पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना चिमटे काढत फटाके उडवले. तर आता आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर टीका करत राजकीय फटाके नववर्षाच्या पूर्वसंध्येला फोडले आहेत. लफडी कळली तरी सोडत नाही अशी शिवसेनेसारखी बायको पाहिजे असं ट्विट करत नितेश राणे यांनी शिवसेनेला डिवचलं आहे.



शिवसेनेला टार्गेट

शिवसेना आणि राणे परिवार यांच्यात नेहमीच शाब्दिक सामना रंगलेला पाहायला मिळतो. २०१८ या वर्षात तर प्रकर्षाने हे दिसून आलं आहे. राणे कुटुंबांकडून अनेकदा शिवसेनेला टार्गेट करण्यात आलं  असून वर्षाच्या शेवटच्या दिवशीही नितेश राणे यांनी शिवसेनेला चांगलाच टोमणा मारला आहे. शिवसेना सत्तेत असून भाजपावर टिका करते. शिवसेनेच्या आमदारांकडून राजीनामा देण्याची भाषा होते. पण प्रत्यक्षात सेना सत्तेतून काही बाहेर  पडत नाही. शिवसेनेकडून भाजपावर टीका केली जाते. सामनाच्या अग्रलेखातून वारंवार भाजपा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा सरकारवर टोकाची टीका केली जाते.


बाकी संसार सुरू 

एवढं सगळं होतं. पण सेना काडीमोड घेत नाही, सत्ता सोडत नाही या आशयाचं ट्विट करताना नितेश राणेंनी बोचऱ्या शब्दांचा वापर केला आहे. असंख्य नवरे बोलत असतील, बायको शिवसेनेसारखी पाहिजे, लफडी कळली तरी सोडत नाही, जास्ती जास्त तर काय एक सामन्यातून अग्रलेख, बाकी संसार सुरू असं ट्विट नितेश राणेंनी केलं आहे. त्यांचं हे ट्विट आता चर्चेचा विषय बनलं असून नितेश राणेंच्या या ट्विटला शिवसेना-शिवसैनिक काय उत्तर देतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल.



हेही वाचा - 

चलो कोरेगाव-भीमा, विजयस्तंभाला अभिवादन करण्यास जाणाऱ्यांना टोलमाफी!




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा