Advertisement

चलो कोरेगाव-भीमा, विजयस्तंभाला अभिवादन करण्यास जाणाऱ्यांना टोलमाफी!

राज्यभरातून कोरेगाव-भीमाला जाणाऱ्या वाहनांना सहकार्य करावं, त्यांच्याकडून टोल घेऊ नये, अशा सूचना देण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिली. सरकारकडून अधिकृत टोलमाफी देण्यात आलेली नाही, पण लोकभावना लक्षात घेता टोल नाक्यावर टोल न आकारण्याची सूचना दिल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

चलो कोरेगाव-भीमा, विजयस्तंभाला अभिवादन करण्यास जाणाऱ्यांना टोलमाफी!
SHARES

पुण्यातील कोरेगाव-भीमा इथं १ जानेवारीला शौर्यदिनी ऐतिहासिक विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी लाखो अनुयायी मुंबईसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून पुण्याच्या दिशेने निघतात. या पार्श्वभूमीवर कोरेगाव-भीमासाठी जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी द्यावी, अशी मागणी होत होती. ही मागणी मान्य करत राज्यभरातून कोरेगाव-भीमाला जाणाऱ्या वाहनांना सहकार्य करावं, त्यांच्याकडून टोल घेऊ नये, अशा सूचना देण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिली. सरकारकडून अधिकृत टोलमाफी देण्यात आलेली नाही, पण लोकभावना लक्षात घेता टोल नाक्यावर टोल न आकारण्याची सूचना दिल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.


आठवले यांची मागणी

राज्यभरातून कोरेगाव-भीमा इथं येणाऱ्या-जाणाऱ्यांची संख्या लक्षात घेता तसंच टोलनाक्यांची संख्या लक्षात घेता आंबेडकर अऩुयायांच्या सोयीसाठी त्यांना टोलमाफी द्यावी, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केली होती. सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे ही मागणी आठवले यांनी केली होती. या निवेदनाची दखल घेत सर्व टोलनाक्यांवर तशा सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र जे टोल भरू शकतात वा ज्यांना टोल भरावासा वाटतो त्यांनी जरूर टोल भरावा, असं आवाहनही शिंदे यांनी केलं आहे.


चोख पोलिस बंदोबस्त

मुंबईतूनही दरवर्षी कोरेगाव-भीमाला जाणाऱ्या आंबेडकरी अनुयायांची संख्या मोठी असते. त्यानुसार यंदाही मोठ्या संख्येने ३१ डिसेंबरच्या रात्री आणि १ जानेवारीच्या सकाळी मुंबईत वाहनं कोरेगाव-भीमाच्या दिशेने निघतील. तेव्हा मुंबईतून जाणाऱ्या वाहनांना, आंबेडकरी अऩुयायांना टोलमाफीचा लाभ घेता येणार आहे.

दरम्यान गेल्यावर्षी कोरेगाव-भीमा इथं झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला असून शौर्यदिन सुरळीत पार पाडावा यासाठी पुणे पोलिस सर्व घडामोडींवर बारीक नजर ठेवून आहे. तर यंदा १ जानेवारीला १० लाख आंबेडकर अनुयायी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे.



हेही वाचा-

आझाद यांच्या पुण्यातील सभेला उच्च न्यायालयाचा नकार, कोरेगाव-भीमाला जाणार

१ जानेवारीला भीमा-कोरेगावला जाणारच; प्रकाश आंबेडकर यांचा निर्धार



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा