Advertisement

आझाद यांच्या पुण्यातील सभेला उच्च न्यायालयाचा नकार, कोरेगाव-भीमाला जाणार

मवारी पुणे पोलिसांनी न्यायालयात हजर राहत आझाद नजरकैदेत नाहीत वा त्यांना अटकही करण्यात आलं नसल्याचं सांगितलं. सभेस न्यायालयाने नकार दिला असला तरी आझाद यांना कोरेगाव-भीमा इथं जाण्यास परवानगी दिली आहे.

आझाद यांच्या पुण्यातील सभेला उच्च न्यायालयाचा नकार, कोरेगाव-भीमाला जाणार
SHARES

भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांना पुणे विद्यापीठ इथं सभा घेण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी एक याचिकेद्वारे भीम आर्मीकडून मुंबई उच्च न्यायालयात रविवारी दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सोमवारी सकाळी सुनावणी झाली असून न्यायालयाने सभेस परवानगी नाकारली आहे. त्यामुळे आता पुण्यात आझाद यांची सभा होणार नाही हे स्पष्ट झालं आहे. मात्र आझाद यांना कोरेगाव भीमामध्ये जाण्यास परवानगी देत न्यायालयाने आझाद यांना थोडाफार दिलासा दिला आहे.


न्यायालयात याचिका

महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या आझाद यांना मुंबई पोलिसांनी नजरकैदेत ठेवत त्यांच्या वरळीतील सभेला परवानगी नाकारली होती. आझाद २ दिवस नजरकैदेत असतानाच भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांचीही धरपकड पोलिसांनी केली. पुण्यातील सभेलाही पोलिसांकडून परवानगी मिळत नसल्याने शेवटी आझाद यांनी न्यायालयात धाव घेतली. नजरकैदेतून सुटका, सभेस परवानगी आणि कोरेगाव भीमाला जाऊ देण्याची मागणी त्यांनी याचिकेद्वारे केली.


अटक नाहीच

या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली असून न्यायालयाने सभेस परवानगी नाकारली आहे. न्यायालयाने सुनावणीसाठी पुणे पोलिसांनाही हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सोमवारी पुणे पोलिसांनी न्यायालयात हजर राहत आझाद नजरकैदेत नाहीत वा त्यांना अटकही करण्यात आलं नसल्याचं सांगितलं. सभेस न्यायालयाने नकार दिला असला तरी आझाद यांना कोरेगाव-भीमा इथं जाण्यास परवानगी दिली आहे.


न्यायालयाचा निर्णय मान्य

न्यायालयाचा निर्णय आम्ही मान्य करतो. त्यानुसार पुण्यात सभा होणार नाही. पण २ जानेवारीनंतर महाराष्ट्रात आझाद यांची सभा होईल, अशी प्रतिक्रिया भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रमुख अशोक कांबळे यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिली आहे. कोरेगाव-भीमा इथं जाण्यापासून एका सच्च्या आंबेडकरवाद्याला रोखता येत नाही. हेही न्यायालयाच्या निर्णयामुळे स्पष्ट झाल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.



हेही वाचा-

चंद्रशेखर आझाद पुण्याला रवाना, पण पुण्यात सभा नाही

आझादच्या नजरकैदेचे ४८ तास, सभेसाठी न्यायालयात धाव



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा