Advertisement

चंद्रशेखर आझाद पुण्याला रवाना, पण पुण्यात सभा नाही

दुपारी एकच्या सुमारास आझाद मालाडच्या हाॅटेल मनालीमधून बाहेर पडले असून ते पुण्याच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रमुख अशोक कांबळे यांनी दिली आहे. दरम्यान आझाद यांची संध्याकाळी पुण्यात सभा होणार होती. या सभेला परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे ही सभा होणार नसल्याचंच आता म्हटलं जात आहे.

चंद्रशेखर आझाद पुण्याला रवाना, पण पुण्यात सभा नाही
SHARES

भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांची नजरकैदतून सुटका करावी आणि त्यांना पुण्यास जाण्यासाठी तसंच पुण्यात सभा घेण्यासाठी परवानगी द्यावी यासंबंधीची याचिका भीम आर्मीकडून मुंबई उच्च न्यायालयात रविवारी दाखल करण्यात आली. ही याचिका दाखल करण्यात आल्याबरोबर पोलिसांनी आझाद यांनी पुण्यास जाण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार दुपारी एकच्या सुमारास आझाद मालाडच्या हाॅटेल मनालीमधून बाहेर पडले असून ते पुण्याच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रमुख अशोक कांबळे यांनी दिली आहे. दरम्यान आझाद यांची संध्याकाळी पुण्यात सभा होणार होती. या सभेला परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे ही सभा होणार नसल्याचंच आता म्हटलं जात आहे.


३० डिसेंबरपर्यंत नजरकैदेत

२९ डिसेंबर ते ४ जानेवारी दरम्यानच्या महाराष्ट्र दौऱ्यासाठी आलेल्या आझाद यांना मुंबईत दाखल झाल्याबरोबर पोलिसांनी नजरकैदेत ठेवलं होतं. शुक्रवारी २८ डिसेंबरच्या दुपारी १ वाजल्यापासून ३० डिसेंबरच्या दुपारी १ वाजेपर्यंत आझाद पोलिसांच्या नजरकैदेत होते. त्यांना चैत्यभूमीवर जाऊन डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यापासूनही पोलिसांनी रोखलं. तर त्यांच्या वरळीतील सभेलाही परवानगी नाकारली. असं असलं तरी आझाद आणि भीम आर्मी पुण्याला विशेषत कोरेगाव-भीमाला जाण्यावर ठाम होते. पण पोलिसांनी भीम आर्मीच्या सर्वच्या सर्व महत्त्वाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानं आणि आझाद यांना नजरकैदेत ठेवल्यानं काहीही हालचाली करता येत नव्हत्या.


नरमाईची भूमिका

या पार्श्वभूमीवर भीम आर्मीनं रविवारी नजरकैदेतून सुटका, पुण्यास जाण्याची परवानगी आणि सभेस परवानगी अशा मागण्यांसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. याचिका दाखल करण्याचं पाऊल उचलल्याबरोबर पोलिसांनी नरमाईची भूमिका घेत आझाद यांना पुण्यास जाण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार ते कार्यकर्त्यांसमवेत पुण्याच्या दिशेने निघाले आहेत. मात्र त्याचवेळी त्यांच्या सोबत पोलिसांचा मोठा फौजफाटा आहे. एकार्थाने ते अजूनही नजरकैदेतच असून पोलिस पुण्यातही त्यांच्याबरोबरच असणार आहेत. दरम्यान पुण्याला रवाना होताना आझाद यांनी पवईतील डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केलं.

भीम आर्मीच्या याचिकेवर रविवारी तातडीनं सुनावणी होणं अपेक्षित होतं. पण सरकारी वकील गैरहजर असल्यानं या याचिकेवर सोमवारी सकाळी १० वाजता सुनावणी ठेवण्यात आल्याची माहिती याचिकाकर्त्यांचे वकील अॅड. नितीन सातपुते यांनी दिली आहे.



हेही वाचा-

आझादच्या नजरकैदेचे ४८ तास, सभेसाठी न्यायालयात धाव

भीम आर्मीचे आझाद यांच्या मुंबईसह राज्यातील सभांना परवानगी नाकारली



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा