Advertisement

भीम आर्मीचे आझाद यांच्या मुंबईसह राज्यातील सभांना परवानगी नाकारली

चंद्रशेखर आझाद हे चैत्यभूमीवर दर्शनासाठी आले असताना पोलिसांनी त्यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. सध्या आझाद यांना मालाड येथील मनाली हाॅटेलमध्ये पोलिसांनी नजरकैदेत ठेवलं आहे. हाॅटेलबाहेर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला असून हाॅटेल बाहेर पडण्यापासून भीम आर्मीच्या कार्यर्त्यांना रोखलं जात आहे.

भीम आर्मीचे आझाद यांच्या मुंबईसह राज्यातील सभांना परवानगी नाकारली
SHARES

भीम आर्मी भारत एकता मिशन या संघटनेचे प्रमुख चंद्रशेखर आझाद हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. याच दौऱ्यादरम्यान आझाद हे शुक्रवारी मुंबईत आले होते. शनिवारी आझाद यांची वरळी येथे जाहीर सभा होती. मात्र, यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहू शकतो. ही कारणं देत पोलिसांनी आझाद यांच्या जाहीर सभेस परवानगी नाकारली. तसंच राज्यात होणाऱ्या त्यांच्या सर्व सभांनाही परवानगी नाकारली अाहे.  मात्र, पोलिसांच्या परवानगीला न जुमानता आझाद हे मुंबईत सभा घेण्याच्या निर्णयावर ठाम असल्याने पोलिसांनी त्यांना नजरकैदेत ठेवलं असल्याचं सांगितलं जात आहे.




हाॅटेलबाहेर मोठा बंदोबस्त

चंद्रशेखर आझाद हे चैत्यभूमीवर दर्शनासाठी आले असताना पोलिसांनी त्यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. सध्या आझाद यांना मालाड येथील मनाली हाॅटेलमध्ये पोलिसांनी नजरकैदेत ठेवलं आहे. हाॅटेलबाहेर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला असून हाॅटेल बाहेर पडण्यापासून भीम आर्मीच्या कार्यर्त्यांना रोखलं जात आहे. पोलिस दुट्टपीपणा करत असून याबाबतची माहिती चंद्रशेखर आझाद यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. पोलिस चुकीच्या पद्धतीने कारवाई करत, आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असून पोलिसांकडून खूपच वाईट वागणूक मिळत असल्याचं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. नजरकैदेत असताना आझाद यांनी हाॅटेलच्या खिडकीतून संविधान पुस्तक दाखवून ही द़डपशाही चालणार नाही अशा घोषणाही दिल्या.


महाराष्ट्रात ६ सभा

महाराष्ट्र दौऱ्यावर पहिल्यांदाच आलेले आझाद यांच्या महाराष्ट्रात सहा सभा होणार होत्या. त्यातील पहिली सभा शनिवारी वरळीच्या जांबोरी मैदानात संध्याकाळी ४ वाजता होती कार्यकर्ते पोलिसांच्या नजरकैदेत. त्यानंतर ३० डिसेंबरला पुण्यात सभा, ३१ डिसेंबरला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात व्याख्यान, १ जानेवारीला भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी, २ जानेवारीला लातूर येथे सभा तर ४ जानेवारीला अमरावती येथे जाहीर सभा होणार होती. मात्र, सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहत असल्यामुळे पोलिसांनी या सर्व सभांना परवानगी नाकारात सभा रद्द केल्या आहेत.



हेही वाचा - 

भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद नजरकैदेत, पत्रकार परिषदेलाही पोलिसांची आडकाठी




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा