Advertisement

भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद नजरकैदेत, पत्रकार परिषदेलाही पोलिसांची आडकाठी

शुक्रवारी मुंबईत दाखल झाल्यानंतर आझाद ३.३० वाजता प्रसार माध्यमांशी संवाद साधणार होते. मात्र पोलिसांनी आझाद यांना नजरकैदेत ठेवल्याने नियोजीत पत्रकार परिषदही होऊ शकली नाही. त्यामुळं संतप्त भीम आर्मीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मनाली हाॅटेलकडे धाव घेण्यास सुरूवात केली आहे.

भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद नजरकैदेत, पत्रकार परिषदेलाही पोलिसांची आडकाठी
SHARES

भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद शुक्रवारी मुंबईत दाखल झाले आहेत. २९ डिसेंबर ते ४ जानेवारी अशा ४ दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यासाठी आझाद मुंबईत दाखल झाले असून त्यांची शनिवारी वरळीतील जांबोरी मैदानात जाहीर सभा होणार आहे. मात्र कायदा-सुव्यस्थेचा प्रश्न उपस्थित होईल, असं म्हणत पोलिसांनी या सभेला परवानगी नाकारली आहे. एवढंच नाही, तर आझाद मुंबईत दाखल झाल्याबरोबर पोलिसांनी त्यांना नजरकैदेत ठेवलं आहे. आझाद मालाडच्या हाॅटेल मनालीमध्ये उतरले असून या हाॅटेलला १००० हून अधिक पोलिसांनी घेरलं आहे. त्यामुळे हाॅटेलला पोलिस छावणीचं रूप आलं आहे.


कार्यकर्ते मालाडच्या दिशेने

शुक्रवारी मुंबईत दाखल झाल्यानंतर आझाद ३.३० वाजता प्रसार माध्यमांशी संवाद साधणार होते. मात्र पोलिसांनी आझाद यांना नजरकैदेत ठेवल्याने नियोजीत पत्रकार परिषदही होऊ शकली नाही. त्यामुळं संतप्त भीम आर्मीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मनाली हाॅटेलकडे धाव घेण्यास सुरूवात केली आहे.


ही तर हिटलरशाही...

ही हिटलरशाही असून या हिटलरशाहीला आझाद आणि भीम आर्मी लोकशाहीने उत्तर देतील. तसंच शनिवारची जांबोरीवरील सभा कुठल्याही परिस्थितीत होणारच, अशी प्रतिक्रिया भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रमुख अशोक कांबळे यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिली. तर आझाद यांनीही काहीही झालं तरी शनिवारी चैत्यभूमीला जाऊन डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून ठरल्याप्रमाणं सभा घेणारचं, अशी ठाम भूमिका घेतली आहे.


४ ठिकाणी सभा

दीड-दोन महिन्यांपूर्वीच आझाद यांची तुरूंगवासातून मुक्तता झाली आहे. तुरूंगातून बाहेर आल्यानंतर आझाद यांनी 'भाजपा हटाव, संविधान बचाव' अशी हाक देत देशभर फिरण्याचा चंग बांधला आहे. त्याचाच भाग म्हणून शुक्रवारी ते मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबई, पुणे-भीमा-कोरेगाव, लातूर आणि अमरावती अशा ४ ठिकाणी आझाद यांच्या जाहीर सभा होणार आहेत. या सभेची संपूर्ण तयारी भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. पण मुंबईत दाखल झाल्याबरोबर पोलिसांनी त्यांना नजरकैदेत ठेवल्यानं त्यांच्या सभा होणार का? त्यांचा दौरा होणार का? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.



हेही वाचा-

चंद्रशेखर आझादांच्या वरळीतील सभेला परवानगी नाकारली, सभा घेण्यावर भीम आर्मी ठाम

अॅड. चंद्रशेखर आझाद मुंबईत देणार 'भाजपा हटाव'चा नारा



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा