Advertisement

चंद्रशेखर आझादांच्या वरळीतील सभेला परवानगी नाकारली, सभा घेण्यावर भीम आर्मी ठाम

१६ महिने रासुकाखाली तुरूंगवास भोगून दीड-दोन महिन्यांपूर्वीच आझाद यांची सुटका झाली आहे. तर आझाद पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या, मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत. २८ डिसेंबर ते ४ जानेवारीदरम्यान मुंबई, पुणे, लातुर आणि अमरावती असा त्यांचा दौरा असणार आहे.

चंद्रशेखर आझादांच्या वरळीतील सभेला परवानगी नाकारली, सभा घेण्यावर भीम आर्मी ठाम
SHARES

भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्या वरळी जांबोरी मैदान इथं होणाऱ्या सभेला वरळी पोलिस ठाण्यानं परवानगी नाकारली आहे. पोलिस ठाण्याकडून आयोजकांना कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी चंद्रशेखर आझाद यांच्या सभेला परवानगी नाकारण्यात येत असल्याचं पत्र देण्यात आल्याची माहिती भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रमुख अशोक कांबळे यांनी मुंबई लाइव्हला दिली आहे. पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी आझाद यांचा नियोजित कार्यक्रम होईलच. गरज पडल्यास रस्त्यावर सभा घेऊ अशी ठाम भूमिका आता भीम आर्मीनं घेतली आहे.


१६ महिने तुरूंगवास

१६ महिने रासुकाखाली तुरूंगवास भोगून दीड-दोन महिन्यांपूर्वीच आझाद यांची सुटका झाली आहे. तर आझाद पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या, मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत. २८ डिसेंबर ते ४ जानेवारीदरम्यान मुंबई, पुणे, लातुर आणि अमरावती असा त्यांचा दौरा असणार आहे. भाजपा-मोदी हटवा, संविधान बचाव असा नारा देत आझाद देशभर फिरत असून त्याचाच भाग म्हणून ते महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत.


२९ डिसेंबरला सभा

२८ डिसेंबरला आझाद मुंबईत येणार असून २९ डिसेंबरला सकाळी ते चैत्यभूमीवर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी जाणार आहेत. त्यानंतर ४ वाजता त्यांची जांबोरी मैदानावर सभा होणर आहे. त्यानुसार या सभेच्या परवानगीसाठी २ डिसेंबरलाच स्थानिक  पोलिस ठाण्याला भीम आर्मीकडून पत्र भीम आर्मीकडून पाठवण्यात आलं. तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जांबोरी मैदान भाड्यानं घेत त्याची रक्कमही भीम आर्मीनं भरली आहे. आता कार्यक्रमासाठी काहीच दिवस शिल्लक असताना पोलिसांनी परवानगी नाकारल्याचं पत्र भीम आर्मीला दिलं आहे. हे जाणिवपूर्वक करण्यात येत असल्याचा आरोप कांबळे यांनी दिली आहे. 


अपुरे पोलिस

भीमा-कोरेगाव पार्श्वभूमीवर जांबोरीतील सभेला  परवानगी नाकारण्यात आल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. तर चैत्यभूमीवरील कार्यक्रमासाठीही पोलिसांनी परवानगी नाकारली असून रविवारचा दिवस असल्यानं पोलिसांची कुमक कमी असल्याचं कारण यासाठी दिल्याचंही कांबळे यांनी सांगितलं आहे. पण पोलिसांच्या-सरकारच्या या दडपशाहीला न घाबरता आझाद यांचा कार्यक्रम होणारच असा निर्धार कांबळे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे येत्या काळात सरकार-पोलिस आणि भीम आर्मी असा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.



हेही वाचा - 

१ जानेवारीला भीमा-कोरेगावला जाणारच; प्रकाश आंबेडकर यांचा निर्धार




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा