Advertisement

१ जानेवारीला भीमा-कोरेगावला जाणारच; प्रकाश आंबेडकर यांचा निर्धार

भीमा-कोरेगाव गेल्या वर्षी १ जानेवारी रोजी भीमा-कोरेगाव येथे दोन गटांत संघर्ष होऊन हिंसाचार झाला होता. याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले होते. या पार्श्वभूमीवर यंदा भीमा - कोरेगावच्या स्तंभाजवळ सभा घेण्याची परवानगी कुणालाही देणार नाही, असं सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं.

१ जानेवारीला भीमा-कोरेगावला जाणारच; प्रकाश आंबेडकर यांचा निर्धार
SHARES

 १ जानेवारी रोजी भीमा-कोरेगाव येथील ऐतिहासिक विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी जाणार असल्याचा निर्धार भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला अाहे.  भीमा-कोरेगावला जाण्यापासून अाम्हाला कोणी रोखू शकत नाही, असा अाक्रमक पवित्रा प्रकाश आंबेडकर यांनी घेतला अाहे. 

परवानगी देणार नाही

 भीमा-कोरेगाव गेल्या वर्षी १ जानेवारी रोजी भीमा-कोरेगाव येथे दोन गटांत संघर्ष होऊन हिंसाचार झाला होता. याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले होते. या पार्श्वभूमीवर यंदा भीमा - कोरेगावच्या स्तंभाजवळ सभा घेण्याची परवानगी कुणालाही देणार नाही, असं सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. 

भाजपाविरोधी वातावरण 

प्रकाश आंबेडकर शुक्रवारी अहमदनगर दौऱ्यावर होते. भीमा-कोरेगाव येथे जाण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही, असं यावेळी त्यांनी म्हटलं अाहे. तर मराठा समाजाला दिलेल्या अारक्षणामुळं ओबीसी समाज अस्वस्थ असून याचे पडसाद निवडणूकीत उमटू शकतात. भाजपाविरोधी सध्या देशात विरोधी वातावरण तयार झाले असून भाजपाला दोनशेपेक्षा कमी जागा मिळतील, असंही अांबेडकर यांनी म्हटलं. 

हेही वाचा - 

शिवस्मारकाचं गुपचूप भूमिपूजन; मेटेंवर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत कारवाईची मागणी

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा