निवेदिता शिंदे विक्रीकर विभागात सहाय्यक आयुक्त

 Pali Hill
निवेदिता शिंदे विक्रीकर विभागात सहाय्यक आयुक्त
निवेदिता शिंदे विक्रीकर विभागात सहाय्यक आयुक्त
See all

मुंबई - निवेदिता शशांक शिंदे यांची विक्रीकर विभागात सहाय्यक आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली. यासंबंधीचे नियुक्ती आदेश अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते त्यांना देण्यात आले. 26/11 ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या पोलीस सेवेतील व्यक्तींच्या कुटुंबीयांपैकी एकाला अ किंवा ब श्रेणीतील पदावर शासकीय सेवेत सामावून घेण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार कीर्तीचक्र विजेते शशांक शिंदे यांच्या मुलीला, निवेदिता यांना विक्रीकर विभागात गट अ संवर्गात नियुक्ती देण्यात आली आहे.

Loading Comments