Advertisement

चर्चा काय करता, आरक्षण द्या - धनंजय मुंडे


चर्चा काय करता, आरक्षण द्या - धनंजय मुंडे
SHARES

मराठा आरक्षणावर आम्हाला नुसती चर्चा करायची नाही. आम्हाला आता आरक्षण पाहिजे, असे म्हणत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे मंगळवारी विधानपरिषदेत सरकारवर कडाडले.

शिवसंग्रामचे नेते आणि आमदार विनायक मेटे यांनी सभागृहाचे कामकाज सुरू होताच मराठा आरक्षणावर चर्चा व्हावी, अशी मागणी केली. त्यावर मुंडे यांनी सरकारला आणि मेटे यांनाही खडे बोल सुनावले.

सत्तेत असूनही तुम्ही मराठा आरक्षणावर चर्चा करण्याची मागणी कशी काय करता, आता आम्हाला चर्चा नको, आरक्षण हवे आहे. डिसेंबर २०१४ पासून मराठा आरक्षणावर अनेकदा चर्चा झाल्या आहेत.

त्यामुळे उद्या राज्यातून लाखोंच्या संख्येने सहभागी होणारे मराठा हे आरक्षणाची सभागृहात चर्चा व्हावी म्हणून मोर्चात सहभागी होत नाहीत, तर त्यांना आता सरकारने आरक्षण जाहीर करावे, या मागणीसाठी येत आहेत. त्यामुळे आता चर्चा नको, असे सांगत मुंडे यांनी मेटे यांच्या मागणीवर जोरदार आक्षेप घेतला.

यादरम्यान, सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी हा विषय कोणत्या आयुधांवर विचारला जात आहे, असा सवाल करत प्रश्नोत्तरे पुकारली. त्यातच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली. त्यामुळे सभापतींनी २० मिनिटांसाठी सभागृहाचे
कामकाज तहकूब केले.



हे देखील वाचा -

मराठा मोर्चासाठी मुंबई सज्ज! महापालिकेच्या विशेष सुविधा...



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा