Advertisement

परिचारकांना विधानपरिषद प्रवेश बंदी


परिचारकांना विधानपरिषद प्रवेश बंदी
SHARES

सैनिकांविषयी अवमानकारक वक्तव्य करणारे भाजपाचे आमदार प्रशांत परिचारक यांच्या निलंबनावर अंतिम निर्णय होईपर्यंत त्यांना सभागृहात प्रवेश न देण्याचा निर्णय विधान परिषदेच्या सभागृहात घेण्यात आला.


पुन्हा निलंबनाची मागणी

मंगळवारी विधान परिषदेच्या कामकाजाला सुरूवात होताच शिवसेनेचे आ. अनिल परब यांनी प्रशांत परिचारक यांचं निलंबन कायम ठेवण्याची मागणी करत निर्णय होईपर्यंत त्यांना सभागृहात प्रवेश देण्यात येऊ नये, अशी मागणी केली. अनिल परब यांनी केलेल्या मागणीला विरोधकांनी पाठिंबा दिला. यावर सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी प्रस्ताव पडताळून याविषयीचा निर्णय देण्यात येईल, असं सांगितलं.


देशद्रोह खपवून घेणार नाही

प्रशांत परिचारक यांनी केलेलं वक्तव्य म्हणजे देशद्रोह आहे. त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव कायद्याच्या चौकटीत बसत नाही. म्हणून त्यांचा देशद्रोह दडपता येणार नाही. परिचारक यांचं निलंबन रहित करण्याचा प्रस्ताव गोंधळात संमत करण्यात आला. म्हणून मी तो नव्याने मांडत आहे. माझी आमदारकी गेली तरी चालेल, पण देशद्रोह खपवून घेणार नाही, असं वक्तव्य आ. परब यांनी केलं.

विधानपरिषद सभागृहात परिचारक यांच्याविषयी निर्णय झाल्यानंतर तो विधानसभा सभागृहाला कळवला जाणार आहे.



हेही वाचा-

परिचारक प्रकरणावरून शिवसेनेचा सभात्याग

परिचारकांच्या निलंबनावरून खडाजंगी कायम



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा