Advertisement

आळंदीत लाठीचार्ज झाला नाही, राजकारण करू नका : देवेंद्र फडणवीस

पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

आळंदीत लाठीचार्ज झाला नाही, राजकारण करू नका : देवेंद्र फडणवीस
SHARES

रविवारी पुणे जिल्ह्यातील आळंदी शहरातील संत ज्ञानेश्वर पालखी मिरवणुकी दरम्यान पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच, विरोधकांनी सरकारची निंदा केली.

आळंदीतील घटनेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘आळंदीत लाठीचार्ज झाला नाही, त्यामुळे घडलेल्या घटनेचे राजकारण करू नका,’ असे म्हटले. 

काही शाब्दिक बाचाबाची आणि धक्काबुक्की झाल्याचे  त्यांनी मान्य केले. फडणवीस पुढे म्हणाले की, गेल्या वर्षी चेंगराचेंगरी होऊन काही महिला जखमी झाल्या होत्या.

ते म्हणाले, हे एमव्हीएच्या कार्यकाळात घडले. “आम्हाला अशीच परिस्थिती रोखायची होती आणि म्हणून यावेळी प्रमुख जिल्हा न्यायाधीश, धर्मादाय आयुक्त, मंदिराचे प्रमुख विश्वस्त दाघे पाटील आणि सर्व प्रमुख मिरवणुकांचे प्रमुख यांच्यात बैठक झाली. मुख्य मिरवणुकीसाठी प्रत्येकी 75 जणांना पास दिले जातील असे सर्वानुमते ठरले. त्यानुसार नियोजन करण्यात आले, असे फडणवीस म्हणाले.



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा