Advertisement

राज्याराज्यांत जीवघेणी स्पर्धा कशाला?- उद्धव ठाकरे

उद्योग व्यवसायांच्या बाबतीत आपली स्पर्धा बाहेरच्या देशांबरोबर असली पाहिजे, राज्याराज्यांत जीवघेणी स्पर्धा नको, असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं.

राज्याराज्यांत जीवघेणी स्पर्धा कशाला?- उद्धव ठाकरे
SHARES

उद्योग व्यवसायांच्या बाबतीत आपली स्पर्धा बाहेरच्या देशांबरोबर असली पाहिजे, राज्याराज्यांत जीवघेणी स्पर्धा नको. त्याऐवजी केंद्राने कार्यक्षमता व गुंतवणुकीसाठी आकर्षकता अशा निकषांवर निकोप स्पर्धेला प्रोत्साहन द्यावं, असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी व्यक्त केलं. ते नीती आयोगाच्या सहाव्या बैठकीत बोलत होते. ही  बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आली होती.

मुख्यमंत्री या विषयावर म्हणाले की, काही राज्ये वीज सवलतीच्या किंवा जागेच्या दराच्या आकर्षक ऑफर्स देतात. बार्गेनिंग केलं जातं. अमुक राज्य या गोष्टी द्यायला तयार आहे तर तुम्ही काय देणार असं विचारलं जातं.

राज्यात स्पर्धा जरूर व्हायला हवी पण ती सवलती किती देतात अशी आर्थिक नसावी, तर राज्यांच्या प्रशासकीय कार्यक्षमता आणि उपलब्ध सुविधांवर निकोप अशी व्हावी. तरच सर्व राज्यांना त्याचा फायदा होईल, असं सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, केंद्राने गुंतवणुकीसंदर्भात काही निकष ठरवायला हवेत. केवळ पैशाच्या स्वरूपात गुंतवणुकीचा विचार न करता रोजगार किती मिळणार आहे याचाही विचार झाला पाहिजे. असं झालं तर खऱ्या अर्थाने आपण आत्मनिर्भर बनू, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

हेही वाचा- “कल करे सो आज कर”, कार्यालयीन वेळेबाबत पंतप्रधानांकडे उद्धव ठाकरेंची ‘ही’ मागणी

कोविड काळात प्रतिकूल परिस्थिती असूनही महाराष्ट्राने (maharashtra) १ लाख कोटींपेक्षा जास्त सामंजस्य करार केले. विकास मंदावला असला तरी तो थांबला नाही. उलट विविध मार्गानी आम्ही अर्थचक्राला गती दिली, असंही उद्धव ठाकरे  मुख्यमंत्री म्हणाले.

कोकणातील विकासाला प्राधान्य द्यावं

कोकणात सुंदर निसर्ग संपदा आहे, मात्र विकासाच्या नावाखाली जंगले आणि पर्यावरणाचा ऱ्हास होता कामा नये. कोकणात मत्स्य व्यवसाय, पर्यटन, बंदरे विकास यामध्ये राज्य सरकार करीत असलेल्या प्रयत्नांना केंद्राने अधिक मदत करावी.

कोकणातील समुद्र किनाऱ्यांमुळे पर्यटन वाढत आहे, जंगले तोडून मोठमोठे रस्ते होत आहेत, पण पर्यावरणपूरक विकास झाला पाहिजे. केंद्राच्या सागरमाला योजनेत राज्याला पुरेशी मदत मिळाली तर बंदरांची शृंखला होऊ शकेल. प्रधानमंत्री मस्त्य संपदा योजनेत ४ मोठे मस्त्य बंदर व १९ फिश लँडिंग सेंटर्सच्या प्रकल्पांना मंजुरी मिळावी. राज्यात वैविध्यपूर्ण मत्स्य विकास व्हावा म्हणून प्रयत्न करण्यात येत असून त्यामुळेही मोठ्या प्रमाणावर कोकणात रोजगार निर्माण होईल तसंच पर्यटनही वाढेल, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

(no need to competition between the two states says maharashtra cm uddhav thackeray in niti aayog meeting)

हेही वाचा- दादांच्या मनातलं ओळखणारी भाषा शिकायचीय- उद्धव ठाकरे

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा