आझाद मैदानावर गुरुवारी फार्मासिस्टचा घंटानाद

 Pali Hill
आझाद मैदानावर गुरुवारी फार्मासिस्टचा घंटानाद

मुंबई- नॉन फार्मासिस्ट आणि पाच वर्षे औषध दुकानांमध्ये काम करणाऱ्याला सहा महिन्यांचे प्रशिक्षण देत फार्मासिस्ट म्हणून मान्यता देण्याच्या प्रस्तावावरून देशभरातील फार्मासिस्ट संघटना आक्रमक झाल्यात. राज्यातील फार्मासिस्ट संघटनांनीही या प्रस्तावाला विरोध केला असून या प्रस्तावाच्या निषेधार्थ आंदोलन छेडले आहे. त्यानुसार गुरुवारी 22 डिसेंबरला आझाद मैदानावर राज्यभरातील फार्मासिस्ट धडकणार असून घंटानाद करणार आहेत. यात शेकडो संख्येनं फार्मासिस्ट सहभागी होणार असल्याची माहिती महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मासिस्ट असोसिएशनने दिलीय. या आंदोलनानंतरही हा प्रस्ताव केंद्र सरकारने, फार्मसी कौन्सिल आँफ इंडियानं मागे न घेतल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही असोसिएशनने दिला आहे.

Loading Comments